पुणे! Wipro कंपनीतील IT इंजिनिअर युवतीचा खून; Infosys मधील प्रियकराला अटक…

पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरात एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू आहे. या घटनेमुळे हिंजवडी परिसरासह आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

कोमल राजेंद्र डहाके (वय 27, मूळ रा. वर्धा, सध्या रा. साखरे पीजी, हिंजवडी) असे मृत युवतीचे नाव आहे. ती विप्रो (Wipro) कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होती. या प्रकरणी तिचा इन्फोसिस (Infosys) कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रियकर शुभम ज्ञानेश्वर काळबांडे याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

कोमल डहाके आणि शुभम काळबांडे यांच्यात झालेल्या वादानंतर झालेल्या मारहाणीत कोमल हिचा मृत्यू झाला आहे. मात्र, हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला आणि मारहाण नेमकी कुठे व कशी झाली, याबाबतचे तपशील पोलिसांकडून तपासले जात आहेत. कोमल हिच्या मृत्यूचे नेमके आणि वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल (पोस्ट मॉर्टम रिपोर्ट) प्राप्त झाल्यानंतरच तिच्या मृत्यूचे खरे कारण समोर येऊ शकेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पोलिसांनी संशयित प्रियकर शुभम ज्ञानेश्वर काळबांडे याला अटक केली. या प्रकरणाचा सखोल तपास हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पुणे! कॉलेजच्या लिफ्टमध्ये विद्यार्थिनी अडकली तब्बल 14 तास…

पुणे! IT इंजिनिअर महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून घेतला गळफास…

पुणे! पायलच्या लग्नासाठी लाखो रुपयांचा खर्च; मुलगी झाल्यानंतर वाद अन् भावाला शेवटचा मेसेज…

पुणे! आयटी इंजिनीअरने पत्नीला संपवलं अन् मारली गॅलरीतून उडी…

स्वारगेट अत्याचार प्रकरण! पीडित युवतीला सुनावणीवेळी रडली ढसाढसा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!