नाशिक! पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् पत्नीने मोबाईल देण्यास दिला नकार…

नाशिक : पत्नीने मोबाईल देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. पेठरोडवरील आरटीओ कार्यालय जवळील कोमल सोसायटीत ही घटना घडली. पूजा जाधव (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पती आकाश जाधव हा वारंवार तिच्याशी वाद घालत आणि मारहाण करत असल्याची माहिती समोर आली आहे.

रिक्षा चालक असणारा आकाश जाधव कामावरून परत आल्यानंतर पत्नी मोबाईल बघत होती त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्याने ओढणीने पत्नीचा गळा आवळून खून केला. हे दोघेही मूळचे बिहार राज्यातील असून 11 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. अनेक वर्षांपासून आकाश यादव याचे कुटुंब महाराष्ट्र मध्ये राहत असल्याने त्यांनी त्याचे आडनाव जाधव केले होते. पंधरा दिवसांपूर्वीही पतीच्या त्रासाला कंटाळून पूजाने त्याला घरात कोंडून ठेवल्याची माहिती उघडकीस आली आहे या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी आरोपी पती आकाश यादव याला अटक केली असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आकाश जाधव हा पूजाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. या वादातून तो तिला मारहाणही करत असल्याची माहिती समोर आली आहे. पंधरा दिवसांपूर्वी पूजाने पतीच्या त्रासाला कंटाळून त्यालाच घरात कोंडून ठेवल्याची माहितीही तपासातून पुढे आली आहे. पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती आकाश यादव ऊर्फ जाधव याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

नाशिक! निवृत्त RTO अधिकाऱ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या…

नाशिक! बहिणीसोबत प्रेमसंबंध असलेल्या युवकाला स्मशानभूमीजवळ बोलावले अन्…

नाशिकमध्ये भोंदूबाबाने आश्रमातच ओलांडली मर्यादा; महिलेवर लैंगिक अत्याचार…

नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन; कारण आलं पुढं…

नाशिक! डॉ. मनीषा जेजूरकर प्रकरणात नवा ट्विस्ट; दाजीचं वागणं खूप बदललं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!