
पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त अन्…
पुणे: पायल झांबरे यांचा हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात पोलिसांनी झांबरे यांच्या घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईल, तसेच मृत पायल यांचा मोबाईल आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहेत. दरम्यान, पती, सासू आणि सासऱ्यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
पायल झांबरे आत्महत्या प्रकरणी पती अक्षय अरविंद झांबरे (वय 35), सासरा अरविंद वसंतराव झांबरे (वय 68) आणि सासू मंगल अरविंद झांबरे (वय 58 सर्व रा. मंगलमय, मुकुंदनगर) यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
View this post on Instagram
हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात पोलिसांनी झांबरे यांच्या घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, पती अक्षय व सासरे अरविंद यांचे मोबाईल, तसेच मृत पायल हिचा मोबाईल आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे. गुन्ह्यातील आरोपी अक्षता झांबरे ऊर्फ निमन हिचा पोलिस शोध घेत आहेत. मात्र, गुन्ह्यातील उर्वरित 15 तोळे सोने अद्याप मिळालेले नाही.
दरम्यान, मुकुंदनगर येथील अक्षय हाइट्स सोसायटीमधील फ्लॅटमध्ये सोमवारी, 2 नोव्हेंबर रोजी पायल अक्षय झांबरे यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, पायलनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. मात्र, पायलच्या मृत्यूची माहिती समजल्यानंतर त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले. हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असण्याची शक्यता असल्याचा संशयही नातेवाइकांनी व्यक्त केला आहे.
पायल यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून त्यांचा सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. पती अक्षय झांबरे, सासू, सासरे आणि नणंद यांच्याकडून पैशांसह सोन्याची मागणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी दिवाळीच्या सुमारास माहेरून पाच ते दहा तोळे सोने आणण्याची मागणी केली जात असल्याचा आरोप पायल यांच्या नातेवाइकांनी केला आहे. यंदाही अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे ही मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे पायल यांच्या माहेरच्या मंडळींनी सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. पायल यांचे कुटुंब शेतकरी असून दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांनी पुढच्या हंगामापर्यंत वेळ मागितला होता, तरीही त्यांचा छळ सुरूच होता. पायलच्या सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या या मागण्यांमुळे पायल यांच्यावर मानसिक दबाव निर्माण केला जात होता आणि त्यांचा छळ सुरू होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, या सर्व आरोपांची सत्यता पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.
पुणे! पायल झांबरे मृत्यू प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे…
पुणे! पायलच्या लग्नासाठी लाखो रुपयांचा खर्च; मुलगी झाल्यानंतर वाद अन् भावाला शेवटचा मेसेज…
पुण्यातील नामांकित कुटुंबातील IT इंजिनिअर सूनेची आत्महत्या; परिसरात खळबळ…

