
पत्नीची चारित्र्याच्या संशयातून हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या; मुलं झाली पोरकी…
मुंबई : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने तिचा गळा आवळून खूनन केल्याचा आरोप आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीनेही रेल्वेखाली जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे दोन मुलं पोरकी झाली आहेत.
आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मजीद हनीफ खान (वय ५०) याने पत्नी तब्बसुम मजीद खान (वय ४१) अशी मृतांची नावे आहेत. मजीद हनीफ खान हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. रात्री एक ते पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने घटनास्थळावरून पळ काढला आणि त्यानंतर रेल्वेखाली जाऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा रेहान मजीद खान (वय १८) याने फिर्याद दिली आहे. आईची हत्या आणि वडिलांची आत्महत्या यामुळे दोन मुले पोरकी झाली आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक! इंजिनिअर नवऱ्याने चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात घातला दगड…
नागपूर हादरलं! चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीने केली हत्या…
बुलढाणा! पतीकडून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या…
नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…
पुणे शहरात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा चिरुन हत्या; चिमुलकली पोरकी…

