
फिल्मी स्टाईल ड्रामा! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न अन् पोलिसाचे धाडस…
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. कळंब तालुक्यातील बोर्डा गावात दोन धारदार शस्त्रांसह आरोपींनी युवतीच्या घरात प्रवेश करत आई आणि बहिणीचा विरोध झुगारून तिला इरटिका गाडीतून जबरदस्तीने पळवून नेले होते. दगडवाडी खदानजवळ पोलिसांनी आरोपींना घेरलं पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे यांनी थेट झेप घेत आरोपीला पकडले. या कारवाईत युवतीची सुखरूप सुटका झाली. चार आरोपींपैकी तिघांना अटक झाली असून एक फरार आहे.
कळंब तालुक्यातील बोर्डा गावात दुपारच्या सुमारास दोन धारदार शस्त्रांसह इरटिका गाडीतून आलेल्या आरोपींनी थेट युवतीच्या घरात प्रवेश केला. एकतर्फी प्रेमातून युवतीला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि भरधाव वेगाने गावातून पळ काढला. युवतीला घेऊन आरोपी पसार झाल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने गाडीचा पाठलाग सुरू केला. तांदुळवाडी येथे गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला मात्र, आरोपींनी शेतातून गाडी नेत गावकऱ्यांना चकवा दिला, त्यानंतर कळंब शहरातून लातूरच्या रोडच्या दिशेने आरोपींनी गाडी पळवली. आरोपींनी पाठलाग करणाऱ्या नागरिकांच्या आणि पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पाठलाग सुरूच ठेवला. नबोर्डा गावातून सुरू झालेला हा थरार तब्बल ७० किलोमीटरचा प्रवास करत थेट बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरापर्यंत पोहोचला.
View this post on Instagram
अंबाजोगाई परिसरातील दगडवाडी येथील खदानजवळ पोलिसांनी आरोपींच्या गाडीला घेराव घातला. यावेळी आरोपींनी हातात कोयते घेत तब्बल अर्धा तास पोलिसांसमोर फिल्मी स्टाईल ड्रामा केला. यावेळी पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे यांनी मोठ्या धाडसाने आरोपीला पकडण्यासाठी थेट झेप घेतली. आरोपीसोबत झालेल्या झटापटीत त्यांच्या कानाला दुखापत झाली. गणेश वाघमोडे यांना लहानपणापासून कुस्तीची आवड होती. याच कुस्तीतील डावाचा वापर करत त्यांनी युवतीचा जीव वाचावला.
अपहरणासाठी वापरण्यात आलेली इरटिका गाडी आरोपीने तुळजापूर आणि अक्कलकोटला देवदर्शनासाठी जायचे असल्याचे सांगून भाड्याने घेतली होती. मात्र, याच गाडीचा वापर युवतीच्या अपहरणासाठी करण्यात आला. पोलिसांनी चार आरोपींविरोधात कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यातील तिघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला, त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
सिंधुदुर्ग! एकतर्फी प्रेमातून दामिनी पालव हिचा खून; धक्कादायक माहिती समोर…
सोलापूर! एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, दामपत्याने संपवलं जीवन…
नागपूर हादरलं! एकतर्फी प्रेमातून विवाहित शेजाऱ्याने युवतीला संपवलं अन्…
एकतर्फी प्रेम! मैत्रिणीने भेटण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर बोलावलं अन्…
एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळलेल्या युवतीने घेतला जगाचा निरोप…

