प्रेमविवाहानंतर पत्नी गेली सोडून! ‘तू भीड, आम्ही सोडवून घेऊ’ म्हणत रचला कट अन्…

छत्रपती संभाजीनगर : बिअर बारच्या वादातून संभाजीनगरमध्ये युवकाची दिवसाढवळ्या निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. बारला प्रोटेक्शन देण्याच्या वादातून हा खळबळजनक प्रकार घडला आहे. देवेश उर्फ बंटी चंद्रेश दीक्षित (३४, रा. एन-७) असे या घटनेतील मृताचं नाव आहे. तर, पवन पाराश असे आरोपीचं नाव आहे. ही घटना गुरुवारी (२२ ऑक्टोबर) सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास एन-७ रोडवरील एसबीआय बँकेच्या समोर घडली आहे.

देवेश उर्फ बंटी चंद्रेश दीक्षित हा गुरूवारी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास एन-7 रोडवरील एसबीआय बँकेच्या परिसरातून बाईकवर जात होता, तेव्हाच आरोपी त्याचा कारमधून पाठलाग करत होता. याच कारने आरोपीने देवेशच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली, एवढंच नाही तर देवेश ठार झाला का नाही, हे पाहण्यासाठी आरोपी यू-टर्न घेऊन पुन्हा एसबीआय बँकेच्या परिसरात आला, यानंतर आरोपी गाडीतून उतरला आणि त्याने लाकडी दांड्याने देवेशवर हल्ला केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

देवेशची हत्या करून आरोपी थेट सिडको पोलीस ठाण्यात हजर झाला. 10 महिन्यांपूर्वीच पवनचा प्रेमविवाह झाला होता, यानंतर पवन सुधारल्याचं वाटत होतं, पण तो पुन्हा भाईगिरीच्या मार्गावर गेल्याचं लक्षात येताच पत्नी माहेरी निघून गेली. गणेशोत्सव आणि नवरात्राच्या काळात पवनने पुन्हा भाईगिरी सुरू केली होती, बिअर बारला प्रोटेक्शन द्यायच्या वर्चस्ववादावरून त्याचे आणि देवेशमध्ये वाद सुरू झाला.

पवन आणि देवेश हे एकमेकांच्या ओळखीचे होते, पण दांडिया आणि रावण दहनाच्या कार्यक्रमातून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली, त्यातच देवेशने पवनला शिवीगाळ केली या रागातून पवनने त्याचा एक नातेवाईक आणि सहकाऱ्याला मिळून देवेशच्या हत्येचा कट रचला. यानंतर पवनला देवेशचं जिममधील रील दिसलं आणि त्याला लोकेशन समजलं, यानंतर पवनने देवेशचा पाठलाग करून त्याची हत्या केली. हत्येपूर्वी पवनने देवेशचं सोशल मीडिया प्रोफाईलही डिलीट केले.

देवेश दीक्षित हा छत्रपती संभाजीनगरमधील एन-7 या भागात राहत होता. देवेशच्या घरी त्याची पत्नी, एक मुलगी, भाऊ आणि भावजय आहे. 2020 साली देवेशच्या आईचा, 2022 साली वडील आणि 2024 मध्ये एका भावाचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा दोन वर्षांनी 2026 साली देवेशचे ही निधन झाले आहे. यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, आरोपी पवन आणि मृत बंटी दोघेही एकमेकांच्या चांगल्या परिचयाचे होते. मात्र, काही काळापासून त्यांच्यात व्यावसायिक शीतयुद्धाला सुरुवात झाली होती. या दोघांच्यात दांडिया आणि रावणदहन कार्यक्रमात पुन्हा एकदा वाद झाला होता. त्यावेळी त्यांच्यात शिवीगाळही झाली होती. याच घटनेचा राग पवनच्या डोक्यात होता. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येचं प्लॅनिंग अतिशय शांत डोक्याने करण्यात आले होते. पवनला त्याचा १ नातलग आणि साथीदार यांनी ‘तू भीड, आम्ही सोडवून घेऊ’ म्हणत कट रचला होता. याच कटानुसार ही भयंकर हत्या करण्यात आली.

शिवा शर्मा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार श्रद्धा दुबे हिला नागपुरात अटक…

अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट, शिक्षकाकडून प्रेयसीची निर्घृण हत्या अन्…

पुणे! ‘किंग इज बॅक’ असं स्टेट्स ठेवलं अन् सपासप वार…

सिंधुदुर्ग! एकतर्फी प्रेमातून दामिनी पालव हिचा खून; धक्कादायक माहिती समोर…

कोल्हापूर हादरलं! मंदिर परिसरात स्पीकरचा आवाज अन् मुलीचा चिरला गळा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!