पुणे! येरवडा कारागृहात झाली मैत्री अन् बाहेर आल्यावर केलं मोठं कांड…

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात बसून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर गुन्ह्यांची नेटवर्कचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला तब्बल ८६ लाख रुपयांना गंडवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हाय-प्रोफाईल फसवणूक प्रकरणात पोलिसांनी येरवडा जेलमध्ये भेटलेल्या अविनाश ज्ञानोबा बाकलिकर (वय २८, रा. लातूर) आणि तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय २४, रा. मरकळगाव, पुणे) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

अविनाश बाकलिकर हा बीएमएस (डॉक्टर) पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणारा विद्यार्थी असून, सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणात दीड वर्षापासून येरवडा जेलमध्ये होता. तेजस लोखंडे हा अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यात तिथे न्यायालयीन कोठडीत होता. जेलमध्येच दोघांची ओळख झाली. अविनाशने जेलमधील इतर गुन्हेगारांचे संपर्क क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये ‘युनिव्हर्सिटी’ या सांकेतिक नावाने सेव्ह करून ठेवले होते. जामिनावर सुटल्यानंतर अविनाशने त्या गुन्हेगारांच्या संपर्कात राहून तब्बल आठ विविध बँक खाती मिळवली. सायबर गुन्ह्यांसाठी खाती तयार करण्यासाठी आरोपींनी ‘सस्टेनब्लॉक कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘स्टुनोव्हस प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने बोगस कंपन्यांची कार्यालयेही सुरू केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मावळ येथील एका खासगी कंपनीतून उपमहाव्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेल्या ६० वर्षीय अधिकाऱ्याला शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून १० जून ते १४ जुलै दरम्यान तब्बल ८६ लाख रुपये विविध खात्यांत भरून घेतले. यातील ५ लाख रुपये तेजस लोखंडे याच्या बँक खात्यावर जमा झाल्यानंतर पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणात या संपूर्ण जाळ्याचा दुवा पोलिसांच्या हाती लागला.

रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलिस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकिरण नाले आणि पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांनी आरोपींना लातूर आणि पुण्यातील गावातून जेरबंद केले. या प्रकरणात परदेशी साथीदारांचाही सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

पुणे! येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी अन् पोलिसांनी दाखवला खाकीचा हिसका…

Video: Ex IPS रविंद्रनाथ पाटील यांनी येरवडा कारागृहातील दिली धक्कादायक माहिती…

येरवडा कारागृहात कैद्याचा निर्घृण खून; कसा केला पाहा…

येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…

येरवडा कारागृहात आढळले मोबाईल; कसे पोहचतात पाहा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!