
पुणे! चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; घटनेची पुनरावृत्ती…
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरणातील लोकमान्य हॉस्पिटलजवळ एका चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २६) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर दोघांनाही चेंबरमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून दिले. कामगारांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट असून वैद्यकीय अहवालानंतरच खरा प्रकार समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, गेल्या वर्षीही याच परिसरात अशाच प्रकारे चेंबरमध्ये अडकून दोघांचा जीव गेला असताना, पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने प्रशासकीय हलगर्जीपणाविरोधात स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. चेंबरमध्ये उतरल्यानंतर विषारी वायूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
View this post on Instagram
दरम्यान, या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मृत कामगारांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला जात आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Video: पिंपरी-चिंचवडमधील बावधन येथे जमिनीच्या ताब्यावरून तणाव आणि गोळीबार…
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी; भावाच्या मृत्यूचा धक्का…
काळाचा घाला! पिंपरीतील मित्रांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात; कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू…
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील लाचखोर उपनिरीक्षकाच्या घरात मिळालं घबाड…
पुणे! पिंपरी-चिंचवडमध्ये युवतीची सपासप वार करून भररस्त्यात परप्रांतीयांनी केला खून…

