मुलींना नको तिथे हात लावायचा, आदिवासी आश्रम शाळेतील 21 विद्यार्थिनींचा विनयभंग…

ठाणे : गडचिरोलीतील आश्रम शाळेतील घटनेचे पडसाद अद्यापही उमटत असताना शहापूरमधून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. टेंभा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत एकाच वेळी तब्बल २१ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी स्वयंपाकगृहातील मदतनीस गणपत झिपरू गवळी याला बेड्या ठोकल्या आहेत.

आदिवासी विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून आश्रमशाळांमध्ये विविध उपाययोजना केल्या जात असताना शहापूरमधील येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत तब्बल २१ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.
टेंभा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत एकाच इमारतीत हे वसतीगृह चालवले जाते. दुसऱ्या मजल्यावर मुले आणि तिसऱ्या मजल्यावर मुली राहतात. कपडे धुण्यासाठी आणि जेवणासाठी मुलींना वारंवार खाली यावे लागते. याच गोष्टीचा गैरफायदा आरोपी गणपत गवळी घेत होता. मुली जेवणाचे ताट धुण्यासाठी आल्यानंतर आरोपी विनाकारण नको तेथे स्पर्श करायचा. १०वीत शिकणाऱ्या एका पीडित मुलीला त्याने एकटे गाठून तिच्यावर थेट अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलींनी संपूर्ण हकीकत वसतीगृह अधीक्षकांना सांगितली. यानंतर अधीक्षकांनी मुलींना सोबत घेऊन थेट शहापूर पोलिस ठाणे गाठले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५४ आणि अतिशय कडक अशा पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून थेट आधारवाडी मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे. तपासात उघड झालेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या आरोपीने यापूर्वीही आश्रमशाळेतील एका मुलीचा विनयभंग केला होता. त्या गंभीर प्रकारानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. पोलिस पुढील तपुस करत आहेत.

धक्कादायक! खासगी ट्रॅव्हलमध्ये रात्रीच्या प्रवासादरम्यान महिलेचा दोनवेळा विनयभंग…

सोलापूर! शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; आता तु चांगली सापडली…

पुणे शहरात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या भाजप नेत्यावर कारवाई; पाहा गुन्हे…

अल्पवयीन मुलीचा झोपेत असताना केला विनयभंग; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल…

अहिल्यानगर! अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!