खवड्या डोंगर प्रकरण! कुणाल याने आयफोनसाठी पाऊल उचललेच नाही; बहिणीने सांगितले…

छत्रपती संभाजीनगर: खवड्या डोंगर घटनेनंतर सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये कुणाल, त्याची आई संगीता आणि वडील मुरली काका यांच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवर कुणालच्या मावस बहिणीने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

कुणालच्या बहिणीने स्पष्ट केले की, कुणाल याने पैशांसाठी किंवा आयफोनसाठी हे पाऊल उचलल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. त्याच्याकडे स्वतःचा आयफोन 15 प्रो होता आणि आई-वडिलांनी त्याला लहानपणापासून कसलीही कमी पडू दिली नव्हती. तसेच, जमिनीच्या वाटणीवरून किंवा बहिणीच्या नावावर जमीन केल्याच्या नैराश्यातून हे घडल्याचा आत्याचा आरोप तिने फेटाळून लावला आहे.

कुणालला नेमकं काय हवे होते? या प्रश्नावर उत्तर देताना त्याची बहीण म्हणाली की, त्याला कोणतीही संपत्ती नको होती, तर त्याला फक्त त्याचे वडील परत हवे होते. गेल्या 20 वर्षांत ज्या आत्याने कधी विचारपूस केली नाही, ती अचानक जवळ आल्याने मुरली काकांना कुटुंबापासून दूर नेत असल्याने कुणाल आणि त्याच्या आईला खटकत होते. मुरली काकांचा स्वभाव अत्यंत निर्मळ होता, कोणी गोड बोलले की ते सहजासहजी विश्वास ठेवायचे. याच गोष्टीचा फायदा उठवून वडिलांना आपल्यापासून दुरावले जात असल्याची भीती कुणालच्या मनात होती. त्याला फक्त त्याचे वडील परत हवे होते.

आम्ही आमचा भाऊ, मावशी आणि काका यांना गमावले आहे, हे खूप मोठं दुःख आहे. अशा वेळी ज्या गोष्टी त्यांनी कधी केल्याच नाहीत, त्या त्यांच्याशी जोडून त्यांची आणि मृत व्यक्तींची बदनामी करू नका, असे आवाहन कुटुंबाने केले आहे. बहिणीने जनतेला आणि मीडियाला चुकीची, अपुरी व अप्रमाणित माहिती न पसरवण्याची आग्रही विनंती केली आहे.

विवाहाच्या वादातून चांदगुडे कुटुंबाचा दुर्दैवी अंत? बहिणीचा गंभीर आरोप, आई-वडिलही मनातलं सगळं बोलले!

खवड्या डोंगर! पत्नी त्याला मुठीत ठेवत होती, जिवंत असताना दूरच राहिला…

कुटुंबच संपलं! डोंगरावरुन पडून मृत्यू होण्यापूर्वी आई आणि लेकाचा काळीज चिरणारा संवाद…

हृदयद्रावक! मुलगा आणि पती दरीत कोसळल्याचे पाहून आईनेही मारली उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!