नाशिक! कायमचा वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् झाडल्या पोटात गोळ्या…

नाशिक : गोसावीवाडी परिसरात जुन्या वादातून एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सुमित अरुण पगारे असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित भाटिया यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास सुमित पगारे, सुमित भाटिया आणि आकाश बोर्डे हे तिघे गोसावीवाडीतील टिळे हॉस्पिटल समोरील गंगोत्री जनता स्टोअर येथे पानमसाला खरेदी करण्यासाठी गेले होते. याच वेळी चौदा जणांचा एक गट तेथे आला आणि त्यांनी जुन्या वादाचा मुद्दा उपस्थित करत तिघांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, काही क्षणांतच या वादाचे रूप हिंसक हल्ल्यात बदलले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, राजिक शेख याने सुमित पगारेला ‘आपल्यातील वाद कायमचा मिटवू’ असे सांगत त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा केवळ एक बहाणा होता. हात मिळवताना राजिक शेख याने कमरेला लावलेले पिस्तूल बाहेर काढले आणि सुमित पगारेच्या पोटावर सलग दोन गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सुमित पगारेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे आणि नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात नाशिकरोड पोलिस ठाण्यात 14 संशयितांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या 24 तासांत 12 संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य गोळीबार करणारा संशयित आणि आणखी एका आरोपीचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे.

हृदयद्रावक! नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू…

नाशिक! नवविवाहित दाम्पत्याचा अंत्यविधीसाठी जात असताना अपघाती मृत्यू…

नाशिक दुहेरी हत्याकांडाने हादरले! पतीने पत्नी, मुलाचा चिरला गळा अन्…

नाशिक! वैष्णवी आवारे हत्येचा उलगडा; प्रियकराला दुसऱ्यासोबत लग्न जमल्याचा राग…

नाशिकमध्ये महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह; अनैतिक प्रेमसंबंधातून संपवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!