
पुणे जिल्ह्यात लग्न ठरलेल्या प्रियकराशी गोळी घेऊन संबंध अन् युवतीचा गूढ मृत्यू…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात युवतीचा अकस्मात संशयास्पद मृत्यू झाल्या प्रकरणी तिच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार या प्रकरणातील आरोपी अथर्व राजेंद्र मेहन (वय २७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व वारंवार शारीरिक संबंधासाठी आग्रह करुन काही गोळ्या देत असल्याचे मृत मुलीच्या मैत्रिणीने सांगितल्याचा दावा आईने केला आहे.
मृत युवतीने बी.एस्सी. अॅग्रीकल्चरचे शिक्षण पूर्ण केले होते. एमपीएससी परीक्षेची तयारी करत होती. डिसेंबर २०२५ मध्ये तिचे अथर्वसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती तिच्या मैत्रिणीकडून आईला मिळाली होती.
View this post on Instagram
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवती आणि अथर्व यांच्या प्रेमसंबंधांनंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने त्यांचा विवाह ठरला होता. मात्र, काही दिवसांपासून ती शांत राहत असल्याचे आईच्या निदर्शनास आले. तिच्या मैत्रिणीने अथर्व वारंवार शारीरिक संबंधासाठी आग्रह धरीत असून, काही गोळ्या देत असल्याचे सांगितल्याचा दावा आईने फिर्यादीत केला आहे. सहा ऑगस्ट रोजी अथर्व युवतीला एमबीए प्रवेशाच्या कामासाठी घेऊन गेला होता. अथर्वची आई व मावशी यांना सोडण्यासाठी दौंडला जात असल्याचे सांगितले. आईने व्हिडिओ कॉल केला असता युवती अथर्वसोबत एका कारमध्ये असल्याचे दिसले. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आईने मुलीला फोन केला; मात्र तिने फोन उचलला नाही. नंतर अथर्वला फोन केल्यानंतर आईचे मुलीशी बोलणे झाले. त्यावेळी अथर्व मला घरी घेऊन जाणार असल्याचे, अथर्वला आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे असल्याचे आणि तो मला गोळी देणार असल्याचे मुलीने सांगितले, असा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
अथर्वच्या घरी जाऊ नकोस आणि तातडीने घरी परत ये, असे आईने सांगितले. रात्री नऊ वाजताच्या सुमारास आईने मेसेज केल्यावर मुलीने जेवण करत असल्याचे उत्तर दिले. त्यानंतर मात्र तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. एमआयडीसी येथील हॉटेलमध्ये जेवण करून दोघे अथर्वच्या घरी आले. रात्री दहाच्या सुमारास आईने फोन केला असता अथर्वने फोन उचलला आणि तिला चक्कर आल्याचे सांगितले. रात्री प्रकृती बिघडल्यानंतर तिला विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वी तिचा मृत्यू झाला. औषधे, वैद्यकीय व डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मुलीचा मृत्यू झाल्याचे त्यावेळी आईला समजले. या घटनेनंतर आईने मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
विवाहबाह्य संबंध अन् ‘कार्यक्रम ओके’ म्हणून प्रियकराचा फोन…
अनैतिक संबंध! पत्नीच्या प्रियकराला एकांतात बोलवले अन्…
प्रियकराला तीन बायका तर प्रेयसीला दोन नवरे; अन् पुन्हा प्रेमसंबंध…
दोन नवरे, एक प्रियकर अन् दीर आणि सासऱ्यासोबत अनैतिक संबंध…
हॉटेलमध्ये शारीरिक संबंधानंतर विवाहित महिलेची प्रियकराकडून निर्घृण हत्या…

