
समर्थ पोलिस लाईनच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी…
गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी जिंकली 8 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदके
पुणे : ॲम्युचर इंडिया किक नांचाकू असोसिएशन आयोजित नॅशनल चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत समर्थ पोलिस लाईन येथील गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहा विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत 8 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची दमदार कमाई केली.
पदक विजेते विद्यार्थी :
श्रीया सांबारे – 2 सुवर्ण पदके
राजवीर पंडित – 2 सुवर्ण पदके
पियुष खवळे – 2 सुवर्ण पदके
प्रभास पवार – 1 सुवर्ण, 1 कांस्य पदक
गगन जोशी – 1 सुवर्ण, 1 रौप्य पदक
रुद्र ओव्हाळ – 1 रौप्य, 1 कांस्य पदक
सर्व विद्यार्थ्यांनी गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक, अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक सुनील सांबारे तसेच प्रशिक्षक अद्विती पंडित, कविता पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कठोर सराव करून हे उल्लेखनीय यश संपादन केले. या यशाबद्दल क्राईम ब्रँच युनिट-1 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश माने, समर्थ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अस्मिता लाड, पोलिस उपनिरिक्षक राहुल मखरे आणि त्यांची टीम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. “अशीच जिद्द, मेहनत आणि शिस्त कायम ठेवून भविष्यातही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवा,” असा मौल्यवान सल्ला देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि नवीन उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले.
स्पर्धेदरम्यानअसोसिएशनचे अध्यक्ष बापू घुले, उपाध्यक्ष अतुल घुले आणि नितीन मुळे यांनीही सर्व पदक विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पोलिसकाका संदीप कद्रे, सचिन मदगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय स्तरावर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीचा झेंडा अभिमानाने फडकविणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, प्रशिक्षकांचे आणि पालकांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स अंतर्गत गुणगौरव समारंभ सोहळा संपन्न…
समर्थ पोलिस लाईन येथील विद्यार्थ्यांचे सिलंबम स्पर्धेत घवघवीत यश…

