
लोणावळ्यात मुसळधार पावसामुळे कलम 163 लागू, पर्यटकांना निर्बंध…
पुणे : पावसामुळे लोणावळा आणि मावळ तालुका परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत आदेश लागू केले आहेत. कलम 163 म्हणजे पर्यटनावर बंदी नसून पर्यटकांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध लावण्यात आले आहेत. 6 जुलै रात्री 12 वाजल्यापासून 31 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. त्यामुळे, आता लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना धबधब्याच्या ठिकाणी किंवा धोकादायक पॉईंटवर जाता येणार नाही. तसेच, अशा ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे किंवा व्हिडिओग्राफी, रिल्स बनवणे बंधनकार करण्यात आले आहे.
लोणावळ्यातील एकवीरा देवी, भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, पवना धरण, लोहगड, विसापूर, तिकोणा, तुंग किल्ला आणि इतर पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. मात्र, अतिवृष्टीमुळे अपघातांचा धोका वाढल्याने प्रशासनाने हे निर्बंधांचे पाऊल उचलले आहे. दरम्यान, पावसाळ्यातील पर्यटनाचा आनंद घेताना जीव धोक्यात घालू नका, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
View this post on Instagram
पर्यटकांवर कोणते निर्बंध…
– 6 जुलै मध्यरात्री ते 31 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत 163 कलम लागू
– धबधबे, ओढे, नदी, धरणात उतरण्यास बंदी
– धोकादायक कड्यांवर सेल्फी, व्हिडिओ शूटिंगला मनाई
– नैसर्गिक धबधब्यांमध्ये प्रवेशास बंदी
– मद्यपान, ध्वनीप्रदूषण, कचरा टाकण्यास बंदी
– महिलांची छेडछाड, बेजबाबदार वाहनचालकांवर कारवाई
– धरण आणि नदीकाठ परिसरात चारचाकी आणि सहाचाकी वाहनांना प्रवेशबंदी
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर माती आणि पाण्याचा प्रचंड लोंढा; पाहा कोणकोणते रस्ते बंद…
महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ; नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; पाहा नावे…
श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत मोठे बदल…
राज्यातील DYSP दर्जाच्या ११५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

