
पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…
पुणे: आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर गेलेल्या युवकाचा फोटो काढताना पाय घसरून खोल दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. केतन विशाल अग्रवाल (वय 24) असे या मृत युवकाचे नाव आहे. गुरुवारी (18 जून) सकाळी घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीचा गुरुवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त दोघांनी सकाळीच लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जाण्याचा बेत आखला होता. दोघेही सकाळी लवकर गडावर पोहोचले. किल्ल्यावर भटकंती सुरू असताना छायाचित्रे काढत होते. किल्ल्यावरील दरीच्या बाजूला उभे राहून केतन एका फोटोसाठी पोज देत होता. मात्र, गडावरील पृष्ठभाग निसरडा झाला होता. फोटो काढत असतानाच अचानक निसरड्या जागेवरून केतनचा पाय घसरला आणि तो थेट खोल दरीत कोसळला.
View this post on Instagram
केतन डोळ्यादेखत दरीत कोसळल्याचे पाहून त्याच्या होणाऱ्या पत्नीने मदतीसाठी एकच आरडाओरडा केला. गडावरील इतर पर्यटकांनी आणि उपस्थितांनी या घटनेची माहिती तातडीने लोणावळा ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ ‘शिवदुर्ग रेस्क्यू टीम’ (Shivdurg Rescue Team) आणि ‘मावळ वन्यजीव पथकाला’ पाचारण केले. बचाव पथकाने दरीत उतरून शर्थीचे प्रयत्न करत केतनला बाहेर काढले. मात्र, दरीत कोसळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
विशेष म्हणजे, मृत केतन आणि त्या युवतीचा विवाह निश्चित झाला होता. येत्या नोव्हेंबर महिन्यात दोघेही लग्नाच्या बोहल्यावर चढणार होते. परंतु, लग्नापूर्वीच केतनवर काळाने घाला घातला. या धक्कादायक घटनेमुळे वाढदिवसाच्या आनंदाचे रूपांतर क्षणात मोठ्या शोकाकुळ वातावरणात झाले. दरम्यान, लग्नासाठी त्याच्या कुटुंबीयांनी जयपूर येथे 17 कोटी रुपये खर्च करून पॅलेस बुक केले होते. तर पाहुण्यांना जयपूर येथे घेऊन जाण्यासाठी दोन विशेष विमानांची सोय देखील केली होती अशी माहिती मिळाली आहे.
पुणे शहरात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; गॅलरीतून उडी मारताना महिलेचा मृत्यू…
पुणे! संक्रांतीच्या दिवशीच ट्रकच्या धडकेत सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू…
पुणे! नवीन थारने कोकणात जाताना अपघातात सहा मित्रांचा मृत्यू; पाहा नावे…
पुणे! नवले पूल अपघतात अभिनेत्याचा मृत्यू! चिमुकला झाला पोरका…

