लेफ्टनंट शुभम हुतात्मा अन् पत्नीने २१ लाखांचा चेक घेतला अन्…

पाटणा (बिहार): आसाममध्ये गेल्या आठवड्यात भारतीय हवाई दलाचं विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत ५ जण हुतात्मा झाले. फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमारदेखील विमानात होते. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला देण्यात आलेल्या नुकसान भरपाईवरुन आता वाद निर्माण झाला आहे. सरकारकडून आणि हुलासगंज सीओंनी २१ लाख रुपयांचा धनादेश शुभम यांच्या पत्नी श्रेयाला देण्यात आला आहे.

शुभम आणि श्रेया यांचे एकमेकांवर प्रेम आहे. त्यांना लग्न करायचं आहे, याची कल्पना त्यांच्या कुटुंबांना होती. शुभमचे कुटुंबीय लग्नासाठी तयार होते. यावर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांचं लग्न होणार होते. शुभमच्या आजीचं निधन झाल्यामुळे लग्न २०२७ पर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. पण, १३ जूनला शुभमला एका लष्करी अभियानादरम्यान वीरमरण आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

शुभम यांच्या मृत्यूची माहिती पत्नी श्रेया राय यांना देण्यात आली. यानंतर श्रेया पतीच्या पार्थिवासह हुलासगंजमधील बनवरिया गावात पोहोचली. तिनं शुभमच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्या दु:खात सहभागी झाली. गावातून शुभमचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी गयाला नेण्यात आले. तिथेही श्रेया उपस्थित होती. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी शुभम यांच्या आईकडे तिरंगा आणि त्यांची टोपी दिली. तर श्रेया राय यांना बिहार सरकारने २१ लाख रुपयांचा धनादेश हुलासगंज सीओ यांच्या मार्फत देण्यात आला. श्रेयाला धनादेश मिळाल्याची कल्पना शुभमच्या आई, वडिलांना नव्हती. गावात परतल्यावर दुसर्‍या दिवशी वडील अमरेंद्र शर्मा ही माहिती समजली. त्यानंतर त्यांनी सीओंशी संपर्क साधला. तेव्हा सीओंनी श्रेया राय यांना २१ लाख रुपयांचा धनादेश दिल्याचे सांगितले.

‘माझ्या लेकानं खरंच श्रेया रायशी लग्न केलं असेल, तर ती माझी सून आहे आणि धनादेश तिलाच मिळायला हवा. पण तिनं पत्नीच्या जबाबदाऱ्यादेखील पार पाडायला हव्या होत्या. पतीचं श्राद्ध होण्यापूर्वीच ती धनादेश घेऊन तिच्या शहरात निघून गेली,’ अशा शब्दांत अमरेंद्र शर्मा यांनी नाराजी बोलून दाखवली. श्रेयानं कुटुंबासोबत राहायला हवं होते. सीओ आणि श्रेया राय, या दोघांपैकी एकानंही धनादेश मिळाल्याची माहिती कळवली नाही. सीओंनी धनादेश द्यायला माझ्या घरी यायला हवं होते आणि श्रेयाने धनादेश न्यायला तिच्या सासरी यायला हवे होतं, असे शर्मा म्हणाले.

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; 10 जवानांचा मृत्यू…

सातारा! जवान विकास गावडे यांना पाणी पाजतानाचा क्षण काळजात चर्रर्र करून गेला…

सातारा सुन्न! एकीकडे पत्नी बाळाला जन्म देत होती अन् दुसरीकडे जवानाचा मृत्यू…

धुळे हादरलं! जवानाला कॉलेजचं प्रेम पुन्हा घावलं अन् पत्नीला संपवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!