
पुणे शहरातील विविध भागांमध्ये झालेल्या फसवणूकीच्या तक्रारींचा आढावा…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील विविध भागांमध्ये चोरी, ऑनलाइन फसवणूकीच्या घटना घडल्या असून, विविध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे…
View this post on Instagram
१) बाणेर पोलिसांची घरफोडीचा तपास सुरू; ५ लाख १५ हजारांचा ऐवज चोरी
बाणेर : बाणेर-पाषाण लिंक रोड येथील व्हॅलेन्सीया अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ५ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेण्यात आला. याप्रकरणी बाणेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.
२) चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन : शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ११ लाखांची ऑनलाइन फसवणूक
पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची ११ लाख ८ हजार ८२५ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. फिर्यादी यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडून गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून पैसे स्वीकारून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. चतुःश्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
३) वानवडी पोलिसांची कारवाई : ‘दिल्ली जेल’च्या नावाने २२ लाखांची फसवणूक
वानवडी : फोन करून दिल्ली जेलमधून बोलत असल्याचे सांगत एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली. फिर्यादींच्या मित्राला जेलमध्ये ठेवण्यात आले असून त्याच्या सुटकेसाठी पैसे आवश्यक असल्याचे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठविण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकारात तब्बल २२ लाख ४० हजार २०० रुपयांची फसवणूक झाली. वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित मोबाईल व बँक खात्यांची माहिती तपासण्यास सुरुवात केली आहे.
४) स्वारगेट पोलिस स्टेशन : गर्दीचा फायदा घेत सोन्याची बांगडी चोरी
स्वारगेट : पीएमपीएमएल बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरी केली. स्वारगेट मेट्रो स्टेशनजवळील बस स्टॉप परिसरात ही घटना घडली असून चोरी गेलेल्या बांगडीची किंमत ५२ हजार ५०० रुपये आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
५) नांदेड सिटी पोलिस : गोडाऊनमधून २० लाखांचे रसायन चोरी
धायरी : रिलायबल केमिकल्सच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी ऑर्थोफॉस्फोरिक अॅसिडचे २०० कॅन चोरी केल्याची घटना समोर आली आहे. चोरी झालेल्या रसायनाची किंमत सुमारे २० लाख रुपये असून नांदेड सिटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
६) हडपसर पोलिस : बस प्रवासात महिलेची २ लाखांची सोन्याची चैन चोरी
हडपसर : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरी केली. जेजुरी ते गाडीतळ हडपसर दरम्यान प्रवास करताना ही घटना घडली. चोरी गेलेल्या चैनची किंमत २ लाख रुपये आहे. हडपसर पोलिस तपास करत आहेत.
७) विमानतळ पोलिस : घरकाम करणाऱ्या महिलेवर सोन्याच्या बांगड्या चोरीचा आरोप
विमाननगर : घरात काम करणाऱ्या महिलेने ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. फिर्यादी यांच्या आईच्या हातातील सुमारे ५ लाख ९५ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरी झाल्याची तक्रार विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.
View this post on Instagram
पुणे पोलिसांचा १७ तासांचा थरार; आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश…
पुणे जिल्ह्यात युवतीला ढकललं कालव्यात अन् 18 तासांनंतर…
पुणे! हिंजवडीमधील IT इंजिनिअरने संपवलं जीवन; चिठ्ठीत दोन महिलांचे नावे…
पुणे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार; सिनेस्टाईलने चौघांना ठोकल्या बेड्या…

