जालना हादरलं! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे सांगताच पालकांना बसला धक्का; आरोपी निघाला…

जालना: जालना जिल्ह्यातील एका गावातील माजी सरपंचाने आपल्याच मित्राच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीनं पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिली आहे. या प्रकरणी जालना जिल्ह्यातील आष्टी पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवनाथ सोपान आयंदे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी माजी सरपंचाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे नुकतेच १२ वीचे शिक्षण पूर्ण झाले असून, ती तिच्या पालकांना शेतीकामात मदत करायची. संशयित आरोपी नवनाथ आयंदे हा पीडितेच्या वडिलांचा मित्र होता. मित्रत्वाच्या नात्यामुळे आणि ओळखीमुळे त्याचं पीडितेच्या घरी आणि शेतात नेहमीच येणं-जाणं असायचे. चार महिन्यांपूर्वी पीडित मुलगी नेहमीप्रमाणे शेतात काम करत असताना आरोपी नवनाथ आयंदे तिथे आला. त्याने पीडितेकडं शरीरसुखाची मागणी केली. यावेळी युवतीने त्याला नकार दिला. परंतु, आरोपीनं तिच्या इच्छेविरुद्ध तिला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यानंतरही त्याने पीडितेला धमकावत तिच्यावर वारंवार अत्याचार सुरूच ठेवला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पीडित मुलीला गेल्या काही दिवसांपासून अचानक उलट्या आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. तिच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने पालकांनी तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. रुग्णालयात डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता, ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी पालकांना सांगितले. डॉक्टरांचा हा खुलासा ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली.

पालकांनी जेव्हा मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली. तेव्हा पीडित मुलीने माजी सरपंच नवनाथ आयंदे याने शेतात आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती दिली. यानंतर पालकांनी तत्काळ आष्टी पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. पीडितेच्या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी माजी सरपंच नवनाथ सोपान आयंदे याच्याविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला.

“गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी नवनाथ आयंदे हा फरार झाला असून, पोलिसांची पथके त्याचा कसून शोध घेत आहेत. त्याला लवकरच अटक करण्यात येईल,” अशी माहिती आष्टी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवशे यांनी दिली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर चुलत भावाने केला अत्याचार; गरोदर राहताच…

साखरपुड्याच्या एक दिवस अगोदर मुलगी गरोदर असल्याचे आले समोर…

धक्कादायक! शिक्षिकेच्या नवऱ्याकडून विद्यार्थिनी राहिली गरोदर…

शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थ्यापासून राहिली गरोदर अन् काढला पळ…

दहावीत शिकणारी मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का; आरोपी निघाला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!