जळगाव! युवक साखरुपड्यानंतर गेला प्रेयसीसोबत लॉजवर अन्…

जळगाव : पाचोरा शहरातील तरुण व्यावसायिक रवींद्र संजय मोरे याच्या लॉजमधील संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. सुरुवातीला लॉजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत रवींद्र याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणात रवींद्रसोबत त्याच्या अल्पवयीन प्रेयसीनेही लॉजमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी लॉज मालक, मॅनेजर आणि प्रेयसी विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

पाचोरा शहरातील गोराडखेडा रोडवरील एका लॉजमध्ये प्रेमीयुगुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेत रवींद्र मोरे (वय २५, रा. गिरड, ता. भडगाव) याचा मृत्यू झाला, तर त्याची अल्पवयीन प्रेयसी दोरीचा फास तुटल्याने बचावली. दरम्यान, रवींद्र मोरे याच्या मृत्यूबाबत नातेवाइकांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला होता. जळगाव येथे शवविच्छेदन करून आणलेला रवींद्रचा मृतदेहही आंदोलकांनी पोलीस ठाण्यात आणल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांनी संबंधित लॉजचा मालक सूरज शिंदे आणि व्यवस्थापक नितीन जंजाळ यांना अटक केल्याची माहिती आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, रवींद्र मोरे याचा महिन्याभरापूर्वीच साखरपुडा झाला होता. त्यामुळे दोघांनी गळफास का घेतला? रवींद्रच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय?, या प्रकरणातील सर्व पैलूंचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, संबंधित मुलीला पुढील कार्यवाहीसाठी बाल सुधारगृहात रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हनी ट्रॅप! श्रीमंतांना लक्ष्य करून लॉजवर बोलवायची अन् बाथरूममध्ये जाताच…

पुणे! महिलेला लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले; पण पोलिसांनी पकडलेच…

पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…

धक्कादायक! महिलेने लॉजमधील चुकीच्या रुमचा दरवाजा ठोठावला अन्…

लातूर! प्रियकरासोबत केला लॉजवर प्लॅन अन् पती दिसताच…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!