नातेवाईकांचा आक्रोश होता हृदय पिळवटून टाकणारा; चिमुकल्यासह आईचा मृत्यू…

सोलापूर: कौटुंबिक छळाला कंटाळून महिलेने दोन वर्षांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेत जीवन संपवल्याची घटना मैंदर्गी परिसरात मंगळवारी दुपारी घडली आहे. भाग्यश्री सिद्धप्पा कट्टीमनी (वय 30) आणि शिवराज (वय २) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

भाग्यश्री कट्टीमनी हिने मैंदर्गी येथील तोरणी रोडलगत असणाऱ्या विहिरीत चिमुकल्या शिवराजसह उडी घेतली. याबाबत माहिती नातेवाईकांनी तिच्या माहेरी कळवली. याबाबत समजताच भाग्यश्रीची आई कलवा बसप्पा पुजारी (रा. भोसगा पुजारी, जि. कलबुर्गी) या नातेवाईकांसह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने मुलगा शिवराजचा मृतदेह बाहेर काढला आणि त्याला अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

भाग्यश्री हिचा शोध सुरू असतानाच तिचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळला. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. तसेच शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

मृत भाग्यश्री हिच्या आईने याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. भाग्यश्रीचा सातत्याने छळ सुरू होता. त्यामुळेच तिने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे जबाबात म्हटले आहे. यामध्ये सासू, सासरे, पती, दोन दीर, नणंद व अन्य एका नातेवाइकाचा समावेश आहे. तिपव्वा कट्टीमणी, शरणप्पा कट्टीमणी, सिद्धप्पा कट्टीमणी, समर्थ कट्टीमणी, नागनाथ कट्टीमणी, गगव्वा पुजारी, यालप्पा कट्टीमणी अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार अमोल माने करीत आहेत.

धक्कादायक! प्रसिद्ध रिलस्टारने हॉटेलच्या स्वयंपाकघरात संपवलं जीवन…

बापाने चार चिमुकल्यांना विहिरीत टाकले अन् घेतला गळफास…

भीषण अपघात! सातारच्या आठ मित्रांची हर्णे बीचची ट्रीप ठरली अखेरची; पाहा मृतांची नावे…

सांगलीत भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार; तू मागच्याजन्मी नागीन अन् हा नाग…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!