जळगाव हादरलं! प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, मोबाईल तपासला अन्…

जळगाव : प्रेम प्रकरणातून युवतीला जाळ्यात ओढत तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, पीडितेकडून 7 लाख रुपयांची वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील यश जैन या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यात अजूनही काही युवतींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

चाळीसगावातील युवती ब्लॅकमेल प्रकरणात आता नवे तपशील समोर येत आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी यश महेंद्र जैन याच्या मोबाईलमध्ये इतरही काही मुलींचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आली. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी सांगितले की, “तपास सुरू असून काही फोटो व व्हिडिओ आमच्या हाती लागले आहेत. मात्र, याबाबत अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच काढता येईल.”

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

दरम्यान, पोलिसांकडून आरोपीच्या मोबाईलमधील डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू असून या प्रकरणात आणखी इतर मुलींना ब्लॅकमेलिंग झाली आहे का?, याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी यश जैन याला कोर्टात हजर केली आहे. मात्र, या व्हिडिओ कांडमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या मोबाईलमध्ये आढळले Video; सहा अटकेत…

कोल्हापूरमध्ये युवतींचे लैंगिक शोषणानंतर बनवले Video; मित्रानेच केला गेम…

नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…

शिक्षक वर्गातच मोबाईलवर पाहता होता अश्लील व्हिडीओ; विद्यार्थ्याने पाहिलं अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!