
पुणे शहरात किरकोळ वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…
पुणे : लग्नाच्या वरातीत नाचताना किरकोळ वाद झाल्यानंतर वादाचा सूड घेण्यासाठी एका युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना धनकवडी परिसरात घडली आहे. तेजस दत्तात्रय पिलाने (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मध्यरात्री तेजसला गाठले आणि त्याच्यावर सपासप वार करून त्याचा जीव घेतला आहे.
एका लग्नाच्या वरातीत काही दिवसांपूर्वी नाचण्याच्या कारणावरून तेजस पिलाने आणि विशाल खोपडे यांच्यात वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले होते आणि त्या प्रकरणी वेल्हा पोलिस ठाण्यात तेजस आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला होता. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास तेजस पिलाने शिवसृष्टी गदा चौक ते कात्रज दरम्यानच्या सर्व्हिस रोडवरून जात होता. यावेळी विशाल खोपडे आणि त्याच्या साथीदारांनी तेजसला अडवले. काही कळण्याच्या आतच आरोपींनी धारदार शस्त्रांनी तेजसवर हल्ला चढवला. त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके रवाना करण्यात आली. तपासादरम्यान पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांना माहिती मिळाली की आरोपी खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरात लपले आहेत. पोलिसांनी तातडीने सापळा रचून विशाल खोपडे (वय २२), अभिषेक खोपडे (वय २३), सचिन धुळे (वय ४३) आणि आदिनाथ कसबे (वय १९) या चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे! बाणेर पोलिसांनी ७२ सीसीटीव्ही फुटेज तपासत चार आरोपींना केले जेरबंद…
पुणे शहरात सलूनमध्ये अंदाधुंद गोळीबार; पोलिसांनी जिवाची पर्वा न करता घातली झडप…
पुणे! लकडी पुलावरील त्या हत्येचा छडा; दोघांना बेड्या, धक्कादायक उलगडा…
पुणे! वकील नवऱ्यासोबत अनैतिक संबंधाच्या संशय; धक्कादायक माहिती समोर…
पुणे शहरात घडली हादरवून टाकणारी घटना; गुन्हा दाखल…

