पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी व्हायरल; अधिकाऱ्याने दिले शूज…

छत्रपती संभाजीनगर: पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका युवकाकडे धावण्यासाठी साधे शूजही नव्हते. साध्या चप्पलवर पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं का? या प्रश्नाचं उत्तर त्याने आपल्या कर्तृत्वाने दिले आहे.

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. पोलीस होण्यासाठी त्याने जीवाचं रान केलं, पण सरावासाठी साधे शूज घेणंही त्याला परवडणारं नव्हते. ज्या मैदानात इतर उमेदवार चांगले शूज घालून धावत होते, तिथे हा तरुण केवळ पायात चप्पल घालून ५ किलोमीटरच्या रनिंगसाठी उतरला. चप्पलवर धावणं कठीण होतं, पाय सोलवटले जात होते, पण डोळ्यांसमोर आई-वडिलांची गरिबी आणि खाकी वर्दीचं स्वप्न होतं. त्याने ते अंतर यशस्वीपणे पूर्ण केले आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

भरती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी DCP विक्रम साळी मैदानावर आले. त्यांनी उमेदवारांशी संवाद साधला. त्यांची नजर चप्पल घालून धावणाऱ्या त्या उमेदवारावर पडली. विक्रम साळी यांनी जवळ बोलावून विचारलं, “तू चप्पलवर का धावलास?” तेव्हा त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. “साहेब, शूज घ्यायला पैसे नव्हते, घरची परिस्थितीही नाही. पण पोलीस होण्याचं स्वप्न आहे ते मी पूर्ण करणार,” असं तो म्हणाला.

युवकाची परिस्थिती ऐकून DCP विक्रम साळी भावुक झाले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या खिशातून पैसे काढले आणि सहकाऱ्यांना त्या मुलासाठी नवीन शूज आणायला पाठवले. काही वेळातच समोर पांढरे शुभ्र शूज आले. जेव्हा DCP विक्रम साळी स्वतःच्या हाताने ते शूज त्या मुलाला दिले. यावेळी कुणीतरी व्हिडीओ काढू लागले. पण विक्रम साळी यांनी सांगितलं, “व्हिडीओ नका काढू, आपली ही मदत खूप छोटी आहे.”

नवीन शूज हातात घेतल्यावर त्या मुलाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्याने वाकून DCP विक्रम साळी यांचे आशीर्वाद घेतले. त्याच्या पाठीवर हात ठेवून कमी वेळात रनिंग पूर्ण कर म्हणत DCP नी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. “आता मी घरी सांगेन की, सरांनी मला हे शूज गिफ्ट दिलेत,” असे म्हणताना त्याचा आत्मविश्वास वाढला आणि मैदानात परीक्षेत जिंकण्याची जिद्दही वाढली. एका युवकाची जिद्द, संघर्ष आणि स्वप्नासाठीची धडपड सगळ्यांना भावून गेली.

हृदयद्रावक! पुण्यात पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान युवकाचा मृत्यू; स्वप्न अधुरे अन् वडील…

महाराष्ट्रात बेरोजगारी! MBA, MCA झालेले उच्चशिक्षित युवक पोलिस भरतीसाठी…

मोठी बातमी! पोलिस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही मिळणार संधी…

महाराष्ट्र पोलिस दलात 15 हजार पदभरती; पाहा कोणत्या पोस्टच्या किती जागा…

पुणे पोलिसांवरील ताण हलका होणार! मोठी पोलिस भरती…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!