पुणे विमानतळावर खळबळ! ‘चायनीज फूड’चा डबा उघडताच अधिकारीही थक्क…

पुणे: लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स विभागाने मोठी कारवाई करत अंमली पदार्थांची मोठी खेप पकडली आहे. यात चक्क २६ कोटी ८० लाख रुपये किमतीचा उच्च दर्जाचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त केला आहे. तस्करांनी हा माल लपवण्यासाठी वापरलेली शक्कल पाहून अधिकारीही थक्क झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडहून पुण्यात एक आयात मालाचा कंटेनर आला होता. कागदपत्रांवर या मालामध्ये ‘चिनी खाद्यपदार्थ’ असल्याचे सांगण्यात आले होते. ‘मँडरिन ऑरेंज सॅक्स’ या नावाने हा माल पांढऱ्या थर्माकोल बॉक्समध्ये अत्यंत सुरक्षितपणे पॅक केला होता. मात्र, कस्टम्सच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी या बॉक्सचे स्कॅनिंग केले. स्कॅनिंगमध्ये मालाचे स्वरूप नैसर्गिक नसल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांनी तपासणी करण्याचे ठरवले.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

अधिकाऱ्यांनी जेव्हा एक बॉक्स उघडला, तेव्हा त्यात सीलबंद टिनचे डबे आढळले. या डब्यांमध्ये वरच्या बाजूला मिठासारखी पांढरी पावडर भरलेली होती. मात्र, जेव्हा ही पावडर बाजूला केली, तेव्हा आत व्हॅक्युम सीलबंद प्लास्टिक पॅकमध्ये ‘हायड्रोपोनिक गांजा’ लपवलेला उघड झाला. संपूर्ण मालाची तपासणी केली असता, एकूण ७६.५८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

पुणे कस्टम्सने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, हा माल पुण्यात कोणाला मिळणार होता आणि या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.

पुणे विमानतळावरून भाजपचा पदाधिकारी अटकेत; कारण बॅगेत…

मुंबई विमानतळावर महिलांची सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारी चक्रावले…

नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; 15 जणांचा जागीच मृत्यू, नोटांसाठी गर्दी…

मुंबई! लंडनहून मुंबईत आल्यानंतर एअर होस्टेसवर अत्याचार…

हृदयद्रावक! डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच एअर होस्टेस रोशनीने घेतला जगाचा निरोप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!