
अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…
नाशिक: अंकशास्त्राच्या नावाखाली राजकारणी, बडे उद्योजक आणि महिलांची फसवणूक करणारा स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्याबद्दल अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरातचा शस्त्र परवाना नुकताच निलंबित करण्यात आला. पण, हा शस्त्र परवानाच पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या परवान्यावरून प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी देखील एसआयटीच्या रडारवर आले आहेत.
अशोक खरात याच्या शस्त्र परवान्याबाबत झालेल्या चौकशीत आता’ट्विस्ट’ समोर आला असून, नाशिकमधील अनेक बड्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. १२ वर्षांपासून लपवून ठेवलेलं हे ‘गुपित’ आता अनेकांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवणार असल्याची चिन्हे आहेत. २०१२ पासून खरातकडे शस्त्र असतानाही नाशिक पोलिस अधीक्षक कार्यालय किंवा वावी पोलिस ठाण्याच्या दप्तरी याची कोणतीही नोंद नसल्याचे समोर आले आहे. तब्बल १२ वर्षे तो बेधडकपणे शस्त्र बाळगून होता आणि प्रशासनाला याचा पत्ताच नव्हता, यावरून पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरात याला वाचवण्यासाठी पुरावे गायब केलेत का? अशी चर्चादेखील सुरू झाली आहे.

अशोक खरात याला २०१२ मध्ये देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रानी दिली. त्यावेळी या परवान्याशी निगडीत असलेले जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक ते स्थानिक पोलिस ठाण्याच्या प्रमुखापर्यंत सगळ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, जानेवारी २०२४ मध्ये खरात याने या परवान्याचे नूतनीकरणही करून घेतले होते. मात्र, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (NDAL-ALIS) ऑनलाईन प्रणालीमध्ये याची कोणतीही नोंद आढळलेली नाही. ज्या परवान्याला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UIN) नसतो, तो बेकायदेशीर मानला जातो. या संपूर्ण ‘मॅनेज’ प्रकरणाची पाळेमुळे खोदण्यासाठी आता ‘एसआयटी’ (SIT) कंबर कसणार आहे.
भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…
भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…
भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…
महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…
सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…
नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…
नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…
अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…
नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…
अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…
नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…
फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

