भिगवण अपहरण प्रकरण! युवती मध्यरात्री पोहचली पोलिस ठाण्यात अन् म्हणाली…

पुणे: भिगवण प्रकरणातील अपहरण झालेली युवती गुरूवारी (ता. १९) मध्यरात्री मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये हजर झाली. त्यानंतर तिने जबाब नोंदवला असल्याची माहिती समोर आली आहे.

युवती स्वतःच्या इच्छेने निघून गेली असल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला आहे. तसेच नेमकं काय घडलेलं, याबाबतही तिने माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जहीर हरून शेख व आयान हरून शेख (रा. शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

भिगवणमध्ये (ता. इंदापूर) आई आणि भावासोबत लग्नासाठी खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना युवतीचे (वय २१) भरदिवसा अपहरण झाल्याची घटना मंगळवारी (ता. 17) दुपारी चारच्या सुमारास घडली होती. तरुणीच्या आईला व भावाला मारहाण करीत डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने टेम्पोमध्ये नेल्याची फिर्याद तरूणीच्या घरातील व्यक्तींनी पोलिसांना दिली होती. मात्र, संबंधित युवतीने व्हिडीओ शेअर करत जबरदस्ती नाही तर माझ्या इच्छेने मी निघून गेले असल्याचे सांगितले होते. मात्र संबंधित तरुणी नेमकी कुठे आहे, तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे सहा पथक रवाना झाले होते. परंतु युवतीचा शोध कुठेही लागला नाही. त्यानंतर गुरूवारी (ता. १९) मध्यरात्री भिगवण प्रकरणातील अपहरण झालेली मुलगी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये हजर झाली. त्यानंतर तिने जबाब नोंदवला असल्याची माहिती समोर आली आहे.

मुलगा आणि मुलगी अपहरण झाल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरवरून युवती आणि मुलगा मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. बारामती पोलिस ठाण्यात आल्यावर पोलिसांनी मुलीचा जबाब घेतला. मुलीने जबाबात मी माझ्या मर्जीने गेले असल्याचे सांगितले. पोलिसांनी घरच्यांना बोलावले. मात्र, घरचे यायला तयार नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

युवतीने भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला फोन केला आणि त्याला शासकीय विश्रामगृहाजवळ बोलावले आणि तिथून ते निघून गेले. चटणी टाकली होती असं तक्रारीत म्हटलं, मात्र कुठल्याही प्रकारची चटणी टाकली नसल्याचे मेडिकल रिपोर्ट मध्ये समोर आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

भिगवणच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट, प्रेमसंबंधाचा Video समोर…

भिगवणमधील युवतीच्या अपहरण प्रकरणात आला नवा ट्विस्ट…

पुणे! इन्स्टाग्रामवरील मुलीच्या माध्यमातून मुलाचे अपहरण अन् निर्घृणपणे हत्या…

पुणे! युवकाचे अपहरण करून विवस्त्र करत बेदम मारहाण अन् काढला व्हिडिओ…

Video: पुणे शहरातून भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; टोळीचा पर्दाफाश…

पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!