मैत्रिणीने लग्नाची पत्रिका अ्न साडी दाखवताच प्रियकराने घेतला जगाचा निरोप…

बंगळुरु : मैत्रिणीने लग्नाची पत्रिका आणि साडी दाखवताच प्रियकराने जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

बंगळुरुत राहणारा जिम ट्रेनर-बॉडीबिल्डर किरण (वय २६) हा तीन वर्षांपासून एका युवतीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने १४ फेब्रुवारी रोजी तिला सरप्राईज गिफ्ट देण्याचेही किरण याने ठरवले होते. मात्र, माझा एका मुलासोबत साखरपुडा झालाय, आम्ही लग्न करत असून, लग्नाची तयारी झाली आहे, असे सांगत मैत्रिणीने किरणला लग्नाची पत्रिका आणि साडी दाखवली. याचा किरणला मोठा मानसिक धक्का बसला. यानंतर किरण अस्वस्थ झाला होता, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

मैत्रिणीसोबत बोलून झाल्यानंतर किरण घरी आला. त्याने स्वतःला आपल्या खोलीत बंद करुन घेत गळफास घेतला. बराच वेळ होऊनही किरण बाहेर येत नसल्याने कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला. आतून प्रतिसाद मिळाल्याने जबरदस्ती दार तोडलं असता, आत किरण लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. त्याला तातडीने व्हिक्टोरिया रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

पुणे! प्रियकराला संपवलं पण सिग्रेट अन् दारुच्या बाटलीने अडकवलं…

अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी गेलेल्या युवतीची प्रियकराने केली हत्या…

मुंबईतील प्रेयसीने घरी बोलवून विवाहित प्रियकराचं कापलं गुप्तांग…

अनैतिक संबंध! पत्नीच्या प्रियकराला एकांतात बोलवले अन्…

प्रेम! प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न; आयुष्यभर तुझीच राहिल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!