लातूर जिल्ह्यात मटका व दारूबंदी गुन्ह्यांविरुद्ध पोलिसांची व्यापक व कठोर कारवाई…

लातूर (श्रीकांत मुंडे): लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच समाजात लपूनछपून सुरू असलेल्या मटका जुगार व अवैध मद्यविक्रीसारख्या बेकायदेशीर धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलिस दलाकडून सातत्याने प्रभावी व कठोर कारवाया करण्यात येत आहे.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांकडून तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडून अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, त्याच अनुषंगाने दिनांक ०३ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी व्यापक कारवाई करण्यात आली. या कारवाईत मटका जुगार व दारूबंदी कायद्याअंतर्गत एकूण १४ आरोपीविरुद्ध एकूण १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

खालील पोलिस स्टेशन येथे मटका जुगार गुन्हे (एकूण – ०८) नमूद आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस स्टेशन गांधी चौक.
1) गौस बेसर मुजावर, वय ४२ वर्षे रा. अंजली नगर, लातूर.
2) अनुराग संतोष टेकाळे, वय २४ वर्षे रा. इंदिरानगर, लातूर.
3) श्रीकांत रामानंद गजभारकर, वय ३७ वर्षे रा. कोल्हे नगर, लातूर.

पोलिस स्टेशन शिवाजीनगर.
1) वसीम निजामसाहेब शेख, वय ३० वर्षे रा. व्यंकटेश नगर, लातूर.

पोलिस स्टेशन विवेकानंद.
1) सचिन विश्वनाथ अडसुळे, वय ३२ वर्षे रा. माताजी नगर, लातूर.

पोलिस स्टेशन विवेकानंद चौक.
1) प्रल्हाद नरसिंग इरले, वय ३८ वर्षे रा. काजी मोहल्ला, लातूर.
2) नरेंद्र साहेबराव टोंगळे, वय २३ वर्षे रा. महादेव नगर, लातूर.
3) महेश बाबुराव कांबळे, वय ३२ वर्षे रा. इंदिरानगर, लातूर.

खालील पोलिस स्टेशन येथे दारूबंदी गुन्हे (एकूण – ०६) नमूद आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
पोलिस स्टेशन गांधी चौक.
1) अलीम सत्तार शेख, वय ४८ वर्षे रा. यशवंत शाळेसमोर, लातूर.

पोलिस स्टेशन गातेगाव.
1) विकास मनोहर घनगावकर, वय ४१ वर्षे, रा. चिंचोली, ता. व जि. लातूर.

2) अनिल गणपती चौधरी, वय ४२ वर्षे रा. चिंचोली, ता. व जि. लातूर.

पोलिस स्टेशन उदगीर शहर.
1) देविदास महादेव बलांडे, वय ६३ वर्षे, रा. रोकडा हनुमान मंदिराजवळ, कंधार वेस, उदगीर.

पोलिस स्टेशन वाढवना.
1) अजय विजय कांबळे, वय २३ वर्षे रा. हेर, ता. उदगीर, जि. लातूर.

पोलिस स्टेशन कासार सिरसी.
1) नितीन भरत सोळुंके,रा. चांदोरी, ता. निलंगा, जि. लातूर

लातूर पोलिसांकडून एका दिवसात अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध एकूण १४ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये मटका जुगार ०८ व दारूबंदी ०६ गुन्ह्यांचा समावेश आहे. नमूद गुन्ह्यांत १४ आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांन्वये कठोर कारवाई करण्यात आलेली असून, पुढील तपास सुरू आहे. तसेच भविष्यात संबंधित आरोपी पुन्हा अवैध धंद्यांमध्ये सहभागी होऊ नयेत, यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. प्रतिबंधक आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध पुन्हा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षक यांनी स्पष्ट निर्देश दिले असून, ‘लातूर जिल्ह्यात मटका, जुगार व अवैध मद्यविक्री यांसारख्या समाजविघातक धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने व सातत्याने सुरू राहणार आहे राहणार आहे.’

लातूर! बनावट सोने देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश…

लातूर! अल्पवयीन विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणी पोलिसांनी घेतली तत्काळ दखल…

लातूर! पोलिस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या…

लातूर! धाब्यावर चिकन अन् दारू पाजली अन् जाळून मारलं पण कानून के हात लंबे होते है…

धक्कादायक! लातूरमध्ये इन्शुरन्साठी दाखवला स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्यालाच जाळलं जिवंत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!