
हृदयद्रावक! बापाने तीन दिवसांच्या लेकीचा घेतला जीव…
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोराड गावात चौथी मुलगी झाल्याच्या रागातून बापानेच तीन दिवसांच्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली आहे. बापाविरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी कृष्णा लालचंद राठोड याच्या पत्नीने तीन दिवसांपूर्वी एका चिमुकलीला जन्म दिला होता. मात्र ही चौथी मुलगी असल्याने कृष्णा राठोड नाराज झाला होता. सुरुवातीला कुटुंबीयांनी आंघोळ करताना मुलगी पडून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्यानुसार पहूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. चिमुकलीला उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान 14 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला होता. दीड महिन्यांनी वैद्यकीय अहवालात मुलीचा मृत्यू अपघाती नसून ठणक वस्तूच्या मारामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.

पोलिसांच्या तपासादरम्यान कृष्णा लालचंद राठोड याने चौथी मुलगी झाल्याच्या रागातून हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पहूर पोलिसांनी कृष्णा राठोड याला अटक करून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हृदयद्रावक! साताऱ्यात थरकाप उडवणारा अपघात; शिक्षिकेचा जागीच मृत्यू…
हृदयद्रावक! बहिण-भावावर एकाचवेळी अंत्यसंस्कार, आई-वडिलांची भेट राहिली अधुरी…
हृदयद्रावक! शिक्षकांचा संप अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जागेवर जीव…
हृदयद्रावक! नवरदेवाने घातला नवरीला हार अन् आला हृदयविकाराचा झटका…
हृदयद्रावक! जळगावमध्ये भीषण अपघात चौघांचा जागीच मृत्यू…

