
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात तुमचं नाव आलंय; कोट्यावधींना गंडा…
पुणे : राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अधिकारी बोलत असून, पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी तुमचं नाव जोडलं गेलंय” अशी भीती दाखवत भामट्याने एका 70 वर्षीय नागरिकाची तब्बल 1 कोटी 44 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. पुण्याच्या सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहरातील कोथरुड येथील महात्मा सोसायटी रस्त्यावर तक्रारदार राहात आहेत. 23 सप्टेंबर 2025 ते 08 ऑक्टोबर 2025 दरम्यान त्यांना एक अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने स्वत:ला “एनआयएचा वरिष्ठ अधिकारी” असल्याचे भासवले. त्याने सांगितले की, “तुमचं बँक खातं पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आर्थिक व्यवहारात वापरण्यात आलं आहे. त्यामुळे तुमच्यावर गंभीर संशय आहे. जर सहकार्य केलं नाही, तर कायदेशीर कारवाई होईल.”
“संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत तुमच्या सर्व बँक खात्यातील रक्कम तात्पुरती ‘सुरक्षित खात्यात’ ट्रान्सफर करावी लागेल.” यानंतर घाबरलेल्या तक्रारदाराने वेगवेगळ्या खात्यांतून 1.44 कोटी रुपये चोरट्याने सांगितलेल्या खात्यांवर पाठवले. काही दिवस गेल्यानंतरही रक्कम परत मिळाली नाही, आणि संबंधित व्यक्तीशी संपर्कही तुटला. यानंतर तक्रारदाराने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरून पुणे सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 66 (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नाशिकमध्ये Digital Arrest च्या नावाखाली कोट्यावधींची फसवणूक…
IPS विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरून 78 लाख रुपयांना लुटलं…
Digital Arrest! IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; कोटींचा गंडा…
पुणे! फेक प्रोफाईल तयार करून महिलेला कोट्यावधी रुपयांना फसवलं…
लग्नाळू आजी-आजोबांची उतारवयात बहरली लव्ह स्टोरी अन् एक दिवस…
Cyber Crime! पुणे शहरात सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस…
पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
Cyber Crime! ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणारे ताब्यात…
पुणे शहरात बनावट नोटा छापणा-या टोळीचा सायबर पथकाकडून पर्दाफाश…
सायबर मर्डर! पुण्यातील उद्योगपतीचं पटना एअरपोर्टवरून अपहरण अन् हत्या…

