राजस्थानमध्ये एसी स्लीपर बसला आग; 20 जणांचा होरपळून मृत्यू…

जयपूर (राजस्थान) : जैसलमेरमध्ये खासगी आराम बसला लागलेल्या भीषण आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचाही मृत्यू झाला. आगीत पंधरा जण 70 टक्क्यांपर्यंत भाजले आहेत. जखमींमध्ये लग्नापूर्वीच्या शूटिंगनंतर जोधपूरला परतणाऱ्या जोडप्याचा समावेश आहे.

जैसलमेर-जोधपूर महामार्गावर मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता एका एसी स्लीपर बसला आग लागली. या अपघातात 20 प्रवासी जिवंत जळाले. काही जणांच्या मृतदेहाचा कोळसा झाला होता. पत्रकार राजेंद्र चौहान यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचाही मृत्यू झाला. आगीत पंधरा जण 70 टक्क्यांपर्यंत भाजले आहेत. जखमींमध्ये लग्नापूर्वीच्या शूटिंगनंतर जोधपूरला परतणाऱ्या जोडप्याचा समावेश आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही. परंतु, बसचा डबा फटाक्यांनी भरलेला होता, त्यामुळेच आग लागली असावी, असा दावा स्थानिकांनी केला आहे.

जैसलमेर बस अपघातात पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर पोस्ट करत लिहिले की, “राजस्थानातील जैसलमेर येथे झालेल्या अपघातात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीमुळे मला खूप दुःख झाले आहे.”

पुणे शहरात मध्यरात्री भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू…

पुणे! चहाच्या टपरीवर सिलिंडरचा स्फोट; अनाथ संतोष पहिल्याच दिवशी होरपळून मृत्यू…

रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू…

प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेलेला प्रियकराचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!