गोविंद बर्गे अन् पूजा गायकवाड प्रकरणातील व्हॉट्सअप चॅट अन् लॉजची माहिती समोर…

सोलापूर : बीड जिल्ह्यातील गेवराईमधील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहे. गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड हिचे काही व्हॉट्सअप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहे. गोविंद बर्गे यांनी या चॅटमध्ये पूजा गायकवाड हिला आत्महत्येची धमकी दिली होती हे आता समोर आले आहे. शिवाय, दोघेही वेगवेगळ्या लॉजवर एकत्र राहिले होते, हे सुद्धा तपासातून उघड झाले आहे.

गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिची सोमवारी (ता. १५) पोलिस कोठडी संपली होती. तिला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी तपासाबद्दल धक्कादायक माहिती कोर्टामध्ये दिली. पूजा आणि गोविंद बर्गे यांच्या कॉल डिटेल मधून पोलिसांसमोर नवीन नवीन खुलासे आले समोर आहे. पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे हे बीड व वैराग येथे वेगवेगळ्या लॉज आणि इतर ठिकाणी एकत्र राहिल्याचे समोर आले आहे. शिवाय, पूजा आणि गोविंद बर्गे यांच्या चॅटिंगमध्ये गोविंद बर्गे याने आत्महत्याची धमकी दिली होती. हे ही समोर आले आहे.

मयत गोविंद हा पूजा गायकवाडच्या प्रेमात पार बुडाला होता. दोघे अनेकदा कलाकेंद्रा व्यतिरिक्त अनेक ठिकाणी एकमेकांना भेटायचे. बीडसह वैराग परिसरातील विविध लॉजवर देखील ते सोबत राहिले आहेत. याशिवाय ते कधी घरी किंवा फ्लॅटवर भेटत असल्याची देखील माहिती आहे. पोलिसांनी पूजा गायकवाडच्या केलेल्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. आपण गोविंदसोबत प्रेमसंबंधात होतो, अशी कबुलीही पूजाने दिली आहे.

बर्गे यांनी पूजाला ७ लाख रुपयांचा पावणे दोन गुंठे प्लॉट विकत घेऊन दिल्याचे पोलिसांनी समोर आणले होते. पण आता पूजा गायकवाडच्या बँक खात्यात गोविंद बर्गे यांच्या नावाने अनेक आर्थिक व्यवहार झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी पूजा गायकवाड हिच्यासोबत काम करणाऱ्या अनेक नागरिक आणि तिच्या मैत्रिणींचा पोलिसांनी जबाब घेतला आहे.

दरम्यान, अगोदर पाच दिवस आणि नंतर दोन दिवस पोलिस कोठडीत राहिल्यानंतर बार्शी न्यायालयाने पूजाला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. पण पूजाला कुठेही जाता येणार नाही. तिला पोलिस चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहावे लागणार आहे. पण आता पूजा गायकवाड जामिनासाठी अर्ज करू शकते. त्यामुळे आता पूजा गायकवाड हिची सोलापुरातील महिला कारागृहात करण्यात रवानगी करण्यात आली आहे. पूजाने संपर्क तोडल्यामुळे नैराश्यात गेल्याने गोविंदने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात आता विविध धागेदोरे समोर येत आहेत. पोलिस सविस्तर तपास करत आहेत.

उपसरपंच गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड प्रकरणात नवा ट्विस्ट…

नर्तकी पूजा हिने माजी उपसरपंच गोविंद बर्गे अन् तिच्या नात्याविषयी सांगितले…

सोलापूरमध्ये नर्तिकेवरून गोळीबार; तू मला काय भुरटा समजतो काय…

उपसरपंच मृत्यू प्रकरणातील नर्तिका पूजाचा जुना Video व्हायरल; मेरे पास चार…

उपसरपंच अंखड बुडाला होता नर्तिकेच्या प्रेमात; कसा झाला शेवट पाहा…

प्रेमात वेडा! बार्शीत नर्तिकेच्या घरासमोर माजी उपसरपंचाने केली आत्महत्या; कारण…

प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी…

दोन लग्न झालेल्या महिलेचे माजी सरपंचासोबत जुळले प्रेमसंबंध अन् पुढे…

बीड हादरलं! सरपंचाने केलेल्या बेदम मारहाणीत महिला वकिलाचे अंग पडले काळे-निळे…

पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…

Video: सरपंचाला मैत्रिणीसोबत रंगेहात पकडलं, बायकोनं धू-धू धुतलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!