‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवाला हिचा मृत्यू; स्वप्न राहिले अपूर्ण…

मुंबईः ‘कांटा लगा गर्ल’ आणि ‘बिग बॉस 13’ मधील स्पर्धक शेफाली जरीवाला (वय 42) हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शेफालीची प्रकृती खालावल्यानंतर तिचा पती पराग त्यांनी यांनी तिला कूपर रुग्णालयात नेले. परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेफालीच्या मृत्यू संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेफालीने 2004 मध्ये मीत ब्रदर्समधील संगीतकार हरमीत सिंहसोबत लग्न केले होते. मात्र ते फारकाळ टिकले नाही. दोघांनी 2009 मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी शेफालीने हरमीतवर काही आरोप केले होते. त्यानंतर, 2015 मध्ये तिने अभिनेता पराग त्यागीसोबत दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. शेफालीला एक मुलं हवं होते. मात्र, काही अडचणी येत असल्याने त्यांनी मुलं दत्तक घेण्याचा विचारही केला होता. मात्र, तिचं ते स्वप्न अपूर्ण राहिले.

शेफालीला वयाच्या 15 व्या वर्षी पहिल्यांदा फिट आली होती. यामुळे तिचा जीव जाण्याची भीती होती. मात्र, तातडीनं उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला होता असे तिने स्वत: एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता. ताण आणि वाढलेलं टेन्शन यामुळे तिला फिट यायवा लागली. त्यावर तिने व्यायाम आणि योगा सुरू केल्यामुळे तिला खूप फरक पडला असे ती स्वत: सांगायची.

दरम्यान, 2002 मध्ये ‘कांटा लगा’ या अल्बममधील गाणे रिलीज झाले आणि ते रिलीज होताच सर्वांच्या पसंतीस उतरले. या गाण्यात शेफाली जरीवालाचा बोल्ड लूक पाहायला मिळाला होता. या गाण्यामुळे शेफाली जरीवालाला चांगली प्रसिद्धी देखील मिळाली होती. 1964 सालच्या समझौता या सिनेमातील प्रसिद्ध गाणे कांटा लगाचे हे रीक्रएटेड व्हर्जन होते. हे गाणे प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी गायले होते. तर कल्याणजी-आनंदजी यांनी संगितबद्ध केले होते.

शेफालीने सुरुवातीच्या काळात फक्त एकाच बॉलिवूड चित्रपटासाठी काम केलं. 2004 साली आलेल्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात शेफाली ‘बिजली’ ह्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर 2008 मध्ये बूगी वूगी, नच बलिए 5, नच बलिए 7 आणि नंतर बिग बॉस 13 सारख्या टीव्ही शोममधून तिने पुन्हा एकदा कमबॅक केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ISHWARII💅 (@ishwariii16)

संजय कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरची पहिली पोस्ट; म्हणाली…

करिना कपूरने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले; चोरटा खूप आक्रमक पण…

अभिनेता तुषार घाडीगावकार याने काम न मिळाल्यामुळे नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल…

अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…

अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!