
सांगली! गर्भवती महिलेची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…
सांगली : गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेवर धार्मिक दबाव टाकत पतीसह सासू, सासऱ्यांनी शारीरिक व मानसिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा कुपवाड पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
ऋतुजा ऊर्फ गौरी सुकुमार राजगे असे त्या मृत विवाहितेचे नाव असून, तिचे वडील डॉ. चंद्रकांत पाटील (रा. गुंडेवाडी, ता. मिरज) यांनी फिर्याद दिली आहे. कुपवाड पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे. पती सुकुमार सुरेश राजगे (वय २९), सासू अलका सुरेश राजगे (वय ४९), सासरा सुरेश राजाराम राजगे (वय ५३, सर्व अश्विनी हौसिंग सोसायटी, यशवंतनगर, कुपवाड) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ऋतुजा हिचा विवाह सुकुमार राजगे याच्याशी २०२१ मध्ये झाला होता. सुकुमार हा मर्चेंट नेव्हीमध्ये सेकंड ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. लग्नात जावयाला साडेचार तोळ्यांची चेन, अंगठ्या असा मानपान केला होता. सुकुमार याच्यासह त्याचे कुटुंबीय ख्रिश्चन धर्माचे अनुकरण, प्रार्थना व रीतिरिवाजाप्रमाणे राहत असल्याचे ऋतुजा आणि तिच्या कुटुंबीयांना लग्नापर्यंत माहिती नव्हते. जून २०२१ मध्ये ऋतुजा हिला पहिला वटपौर्णिमेचा सण सासू अलका हिने साजरा करू दिला नाही. त्यानंतर सुकुमार हा कामावर निघून गेला. लग्नानंतरची पहिली दिवाळी सासरच्या मंडळींनी साजरी करू दिली नाही. ‘आमच्या घरात दिवाळी सण साजरा करत नाही. तू आमच्यासोबत चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येत जा,’ अशी संशयितांनी जबरदस्ती केली. ऋतुजा हिला स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही करू दिला नाही. संशयितांनी तिला वारंवार त्रासही दिला. चर्चमध्ये प्रार्थना, पूजा करण्यासाठी वारंवार तगादा लावण्यात आला.
दरम्यानच्या काळात ऋतुजा गर्भवती राहिली. यावेळी ख्रिश्चन धर्माप्रमाणेच गर्भसंस्कार करू, असा दबावही तिच्यावर टाकण्यात आला. त्यानंतर पती सुकुमार याने मारहाणही केली. ऋतुजाच्या आत्महत्येपूर्वी वडिलांनी जावयासह सासरच्या मंडळींना समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, सततच्या त्रासाला आणि दबावाला ऋतुजा वैतागली होती. अखेर शुक्रवारी (ता. ६) तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वडिलांच्या फिर्यादीनंतर पतीसह तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
पुणे शहरातील ‘रुबी हॉल’मधील डॉक्टरची आत्महत्या; मोबईलचा पासवर्ड…
प्रेयसीच्या चितेवर घेतली प्रियकराने उडी…
सोनमचे होते नोकरावर प्रेम अन् हनिमूनवेळी केला नवऱ्याचा गेम; पाहा टाईमलाईन…
कोल्हापूर हादरलं! लिव्ह इन हत्याकांडाचा झाला थरारक शेवट…
वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती…

