डॉ. शिरिष वळसंगकर यांच्या चिठ्ठीत उल्लेख असलेली महिला गजाआड…

सोलापूर: सोलापूर येथील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 18 एप्रिल रोजी डॉक्टर वळसंगकर यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडत स्वतःला संपवले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी आरोपी महिलेस 23 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.

आरोपी मनीषा माने हिने कामावरून काढल्याने डॉक्टर वळसंगकर यांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. डॉक्टर वळसंगकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या महिलेच्या नावाचा उल्लेख करत आरोपी महिलेमुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप केला होता. आरोपी महिला ही डॉक्टर वळसंगकर यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. तिला कामावरून काढल्याने आरोपी महिलेने डॉक्टर वळसंगकर यांना स्वतः आत्महत्या करण्याचे धमकी दिल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी महिलेने मृत डॉक्टरांना नेमका कसा त्रास दिला? या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहेत का? याचा तपास करायचा असल्याने महिलेला पोलिस कोठडी सुनावण्यात यावी असा सरकारी पक्षाचा युक्तिवाद होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीशांनी आरोपी महिलेस तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

रुग्णालयातील सर्व व्यवहार हे कागदोपत्रांवरही हवे असा डॉक्टर वळसंगकरांचा आग्रह होता. रुग्णांकडून उपचारासाठी कोणतेही नोंद न करता स्वीकारली जाणारी रक्कम यासंदर्भात त्यांनी आक्षेप घेतला होता. जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला वळसंगकरांनी कामावरून काढले होते. कामावरून काढल्यानंतर महिलेने डॉक्टरांना आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.

मनीषा मुसळे माने कोण?
प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्येच प्रशासकीय अधिकारी म्हणून ही महिला काम करत होती. मनीषा मुसळे-माने असे या महिलेचे नाव आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून मनीषा मुसळे-माने सुमारे 20 ते 25 वर्षांपासून काम करत आहे. मनीषा ही डॉ. वळसंगकर यांची अत्यंत विश्वासू कर्मचारी होती.

दरम्यान, डॉक्टर शिरीष वळसंगकर हे 18 एप्रिल ला रात्री आठ वाजता एसपी ऑफ न्यूरोसायन्स येथे रुग्णांची तपासणी करून घरी परतले होते. बेडरूमच्या बाथरूम मधून बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आला. कुटुंबीयांनी बेडरूम कडे धाव घेतली त्यावेळी डॉक्टर शिरीष वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात दिसले. रात्री नऊ वाजता त्यांच्याच रुग्णालयात शिरीष वळसंगकर यांना दाखल करण्यात आले. तब्बल पाऊन तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानंतर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आरोपी महिलेमुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख करण्यात आला होता.

बीड हादरलं! सरपंचाने केलेल्या बेदम मारहाणीत महिला वकिलाचे अंग पडले काळे-निळे…

खाकी वर्दीला सॅल्यूट! परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांच्याकडून माणुसकीच दर्शन…

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा करणारे PSI रणजीत कासले ताब्यात…

हृदयद्रावक! परभणीत शिक्षकाची आत्महत्या; शेती विकून संस्थाचालकाला पैसे…

धक्कादायक! एकाच गावातील युवक आणि युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!