पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना; युवतीला होणारा नवरा नव्हता पसंत…

पुणे : भावी नवरा पसंत नसल्याने त्याला भावी पत्नीनेच थेट जिवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यातून समोर आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी हिचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील युवकासोबत होणार होता. मात्र, मयुरीला त्याच्यासोबत लग्न करायचे नसल्याने त्याला जिवे मारण्यासाठी तब्बल एक लाख 50 हजार रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार यवत पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी मयुरी दांडगे ही सध्या फरार आहे.

पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा आदित्य शंकर दांडगे, संदीप दादा गावडे, शिवाजी रामदास जरे, सुरज दिगंबर जाधव आणि इंद्रभान सखाराम कोळपे या 5 जणांना अटक केली असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील असणारा हा युवक हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होता. 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील खामगाव फाटानजीक यवत पोलिसांच्या हद्दीत एका हॉटेलच्या परिसरात काही जणांनी नवरदेवाला रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यामध्ये, त्याला गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 109,352,351 यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता यातील संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे (रा. गुघलवडगाव ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली. त्यामध्ये, आरोपी आदित्य याने आपल्या साथीदारांसह हा खून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे. शिवाय, आरोपींनी वापरलेली वेरणा कंपनीची पांढऱ्या रंगाची चार चाकी कार ताब्यात घेतली आहे. लग्न जमलेल्या दोन्ही कुटुंबात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! प्रेमविवाहाच्या साखरपुड्याला पाहुणे आले अन् अंत्ययात्रेला जावे लागले…

पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या, व्हॉटसॲप स्टेटसवर लिहीले; पत्नीला माझा चेहरा दाखवू नका…

प्रेयसीचं लग्न ठरल्यानंतर शेवटचं भेटायला बोलावलं अन् झाला शेवट…

मुख्याध्यापक आणि शिक्षक एकाचवेळी शिक्षिकेच्या प्रेमात झाले वेडेपिसे अन्…

पुण्यातील युवतीची बंगळुरूमध्ये नवऱ्याने केली क्रूरपणे हत्या अन् केला फोन…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!