धक्कादायक! प्रियकराने रात्रीच्या वेळी अल्पवयीन प्रेयसीला भेटायला बोलावले अन्…

मुंबई: एका १७ वर्षीय मुलीला आपल्या वयापेक्षा दुप्पट वयाच्या युवकावर प्रेम करणे महागात पडले आहे. आरोपी प्रेयसीला भेटायला आला आणि त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकत तिला जिवंत जाळले आहे. या दुर्घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

आरोपी (वय ३०) आणि पीडित युवती (वय १७) अंधेरी पूर्वेकडील एकाच भागात राहतात. मागील दीड वर्षांपासून दोघं एकमेकांना ओळखत होते. दरम्यानच्या काळात दोघंही अनेकदा एकमेकांना भेटले. पीडित मुलगी आणि आरोपीच्या वयातील अंतर पाहता, स्थानिकांनी अनेकदा त्यांना पकडलं. याची माहिती पीडितेच्या घरच्यांना देण्यात आली. पीडितेच्या कुटुंबीयांनी मुलीला समज दिली. आरोपीला भेटण्यास मज्जाव केला. मुलीने देखील आई वडिलांचं ऐकून आरोपीशी बोलणे आणि भेटणे कमी केले होते. आरोपीने याच रागातून पीडितेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

आरोपी रविवारी रात्री साडेदहा वाजता पीडितेच्या घराबाहेर आला होता. घराबाहेर आल्यानंतर त्याने पीडितेला भेटायला बोलावले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने आधीच सोबत आणलेलं बाटलीतील पेट्रोल तिच्या अंगावर टाकत तिला आग लावली. या धक्कादायक प्रकार घडताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडितेला लागलेली आग आटोक्यात आणली. या घटनेत आरोपीचे हात देखील भाजले आहेत.

पीडितेच्या कुटुंबीयांना तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पीडित मुलगी ६० टक्के भाजली आहे. तिची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचं शीर केलं धडावेगळं…

विवाहित महिलेचा खून केल्यावर प्रियकराने केला मृतदेहावर बलात्कार…

प्रियकराने केली प्रेयसीची हत्या; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर…

धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीला OYO रूमवर बोलावले अन् पुढे…

धक्कादायक! पुणे शहरात प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या आईचा केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!