पुणे शहरातील आयटी परिसरातून परदेशी युवतींची वेश्या व्यवसायातून सुटका…

पुणे : पुणे शहरातील आयटी हिंजवडी परिसरातून चार परदेशी युवतींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. याप्रकरणी परदेशी दलाल महिलेला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

थायलंडमधील चार युवतींना जास्त पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. सोशल मीडियावरून या युवतींचे फोटो पाठवून लोणावळ्यात व्हिला बुक करून वेश्या व्यवसाय केला जात होता. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला, यानंतर पोलिसांनी थायलंडच्या या मुलींची सुटका केली. तसेच दलाल महिलेकडून 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…

पुणे शहरातील पब, बार, हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार; पाहा नियमावली…

पुणे शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह दोन मॉडेल…

प्राध्यापकाच्या बंगल्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; परदेशी युवतीसह…

व्हॉट्सऍपच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा फर्दाफाश, तीन रशियन महिलांसह…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!