चारित्र्यावरून संशय! संसाराचा रक्तरंजित शेवट; मुलं झाली पोरकी…

कोल्हापूर: इचलकरंजी शहरात एकाने चारित्र्यावरून संशय आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवऱ्याने आठ वार करत १५ वर्षांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट केला आहे. घाव वर्मी लागल्याने पीडित महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

दिलीप मनोहर धावोत्रे असे आरोपी पतीचे नाव आहे. मनीषा असे खून झालेल्या माहिलेचे नाव आहे. दोघंही पती पत्नी इचलकरंजी शहाराच्या स्वामी मळा परिसरात वास्तव्याला होते. दोघेही कोरोची येथील कारखान्यात वहिफणीचे काम करत होते. दिलीप आणि मनीषा यांचा विवाह 2010 मध्ये झाला होता. त्यांना दोन मुलंही आहेत. पण मागील काळापासून आरोपी दिलीप आपल्या पत्नीवर चारित्र्यावरून संशय घेत होता.

शुक्रवारी (ता. ७) मध्यरात्री याच कारणातून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर आरोपीनं घरातील धारदार कोयत्याने पत्नीच्या मानेवर, चेहऱ्यावर आणि गळ्यावर सपासप वार केले. एकूण आठ वार करत आरोपीने पत्नीचा खून केला. पत्नीची हत्या केल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास आरोपी स्वत: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीच्या हत्येची कबुली दिली.

दरम्यान, याप्रकरणी मृत मनीषा यांच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी खूनासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पण, यामुळे जोडप्याची दोन्ही मुलं पोरकी झाली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर! बहिणीची छेड काढल्याच्या रागातून मित्राची निर्घृण हत्या…

कोल्हापूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच चाकूने भोसकलं…

एकतर्फी प्रेमातून युवतीवर बलात्कार करून केला खून अन् मृतदेह…

कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, डॉक्टरसह चौघांना अटक…

कोल्हापूर हादरले! मामानेच केली भाचीची अत्याचारानंतर हत्या; डोळा बाहेर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!