
दहेगांव ते शिरोली मार्गावर मोटार सायकल चालकाचा अपघातात जागीच मृत्यू…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील दहेगांव ते शिरोली मार्गावर भरधाव वेगाने मोटार सायकल चालवून झालेल्या अपघातात मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
फिर्यादी एस. टी. चालक सुभाष सायन्ना कंकावार (वय ५२, एस. टी. चालक किनवट आगार) यांनी दिलेल्या जबानी रिपोर्ट वरुन मोटार सायकल चालका विरुद्ध अपराध क्रंमाक ६६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०६, २८१, १२५ (अ) (ब) अंतर्गत घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरचा गुन्हा पोलिस शिपाई देवानंद बन्सोड यांनी नोंदविला असून घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रविण तालकोकुवार तपास करीत आहे.
किनवट आगारातील एस. टी. बस चालक फिर्यादी सुभाष सायन्ना कनकावार (वय ५२ वर्ष, एस. टी. चालक, किनवट आगार जि. नांदेड) समक्ष पोलिस स्टेशनला हजर होऊन जबानी रिपोर्ट दिला की, फिर्यादी दुंड्रा (ता. किनवट) येथे राहत असून किनवट बस आगारात एस. टी. चालक म्हणून कार्यरत आहे. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७/३० वाजता चालक सुभाष कंकावार हे किनवट ते यवतमाळ जाणारी मार्गे मांडवी, पाटापांगरा, घाटंजी या बस क्र. MH २० BL १९८१ (अशोक लेलँन्ड ) या गाडीवर ड्युटी लागली होती. सोबत वाहक म्हणून निलेश कुंडलीक कोरडे हे वाहक म्हणून सोबत होते. सकाळी ८/०० वाजताच्या दरम्यान किनवट वरुन यवतमाळ कडे जाने करीता मांडवी, पाटापांगरा, घाटंजी मार्गे निघालो. सकाळी १०/३० वाजता एस. टी. बस शिरोली कडून दहेगांव कडे जात असतांना दहेगांव शिवारात मी माझ्या डाव्या साईडने एस. टी. बस चालवत असताना दहेगांव वरुन मोटार सायकलने समोरुन येत असतांना मोटर सायकल क्र. MH ४० BP ७८०४ या चालकाने समोरुन वेगाने ईकडे तिकडे पाहत दारुपिल्या सारखे माझ्या डाव्या साईडला आला. नंतर फिर्यादीने एस. टी. बस उजव्या साईडला घेतली. नंतर मोटर सायकल चालक यांने माझ्या उजवा साईडला मोटार सायकल घेतली असता फिर्यादीच्या एस. टी. बसला धडक दिली. त्यामुळे मी त्याला वाचविण्यासाठी एस. टी. बस उजवे साईडला रोडच्या खाली उतरवली त्यामुळे बस मधील काही प्रवाशांना किरकोळ मार लागला.
प्रेमिला अरुन राठोड हिला जबर दुखापत झाल्याने तिला उपचारासाठी घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मोटर सायकल क्र. MH ४० BP ७८०४ या चालकाने एस. टी. बसला भरधाव वेगाने येवून समोरा समोर निष्काळजीपणाने चालवून बसला धडक दिली. त्यामुळे मोटर सायकल क्र. MH ४० BP ७८०४ या दुचाकी वाहनाचा चालक मृत्यु झाला आहे. पुढील कार्यवाही होने करिता घाटंजी पोलिस स्टेशनला येऊन जबानी रिपोर्ट दिला आहे. सदर प्रकरणाचा तपास जमादार प्रविण तालकोकुवार करीत आहेत.
नाशिक हादरलं! मुलीनं लव्ह मॅरेज केलं म्हणून वडिलांनी आईला संपवलं…
हृदयद्रावक! पती-पत्नीचे भांडण अन् जीव गेला दोन चिमुकल्यांचा…
धक्कादायक Video: पुणे शहरात वृद्ध महिलेला लुटण्यासाठी युवतीने काय-काय केले पाहाच…
नाशिकमध्ये बस दरीत कोसळली, 7 जण ठार, 15 गंभीर जखमी…
कत्तलीसाठी चालवलेल्या जनावरांच्या ट्रकला अपघात; ५ जनावरांचा मृत्यू…

