गडचिरोलीत माजी पंचायत समितीच्या सभापतीची नक्षलवाद्यांनी केली निर्दयीपणे हत्या…

गडचिरोलीः गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा थरार माजवत भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुकराम महागु मडावी (वय 46) यांची शनिवारी (ता. १) रात्री निर्दयीपणे हत्या केली. घरातून उचलून गावालगत असणाऱ्या मैदानावर त्यांची हत्या केल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा माजी सभापतीची हत्या करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मृतदेहाजवळ पत्रक देखील टाकले असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. शनिवारी रात्री सशस्त्र नक्षलवाद्यांनी गावात घुसून मडावी यांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने बाहेर ओढून नेले. गावाच्या सीमेजवळ असलेल्या मैदानावर त्यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह सापडला. घटनास्थळी पत्रक फेकून त्यांनी या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी हालचाली कमी झाल्या होत्या, मात्र या हत्येने नक्षलवादी पुन्हा सक्रिय होत असल्याची गावात चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकाराची हत्या…

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…

महाराष्ट्र हादरला! एकाच कुटुंबातील तिघांची गळा चिरून हत्या…

कत्तलीसाठी चालवलेल्या जनावरांच्या ट्रकला अपघात; ५ जनावरांचा मृत्यू…

पोलिस भरती! सरकार 10 हजार पदांची करणार भरती…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!