लोणावळा पोलिसांनी ज्वलंतशिल द्रव्य पदार्थाचा अवैद्य साठा केला जप्त…

पुणे (संदिप कद्रे): मौजे कामशेत (ता. मावळ जि. पुणे) गावचे हद्दीत सुभाष रतनचंद गदिया (रामदिया कॉम्पलेक्स, कामशेत ता.मावळ जि.पुणे) याने गदिया कॉम्पलेक्स येथील एका खोलीत पेट्रोल सदृष्य व रॉकेल सदृष्य ज्वलंतशिल द्रव्य पदार्थाचा अवैद्य साठा करून ठेवल्याची माहिती सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमीद्वारा मार्फत मिळाली होती.

सदर ठिकाणी छापा कारवाई करणेबाबत आदेश झालेने सदर मिळालेले गोपनीय बातमीचे आधारे सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी मानवी जिवीतास धोका होणेचा संभव असतानाही सुरक्षिततेबाबत योग्य ती दक्षता न घेता, हयगयीने व निष्काळजी पणाने अवैध साठा केलेने अत्यावश्यक वस्तू अधिनियमाचे उल्लंघन केलेने त्यावरून सुभाष रतनचंद गदिया रामदिया (कॉम्पलेक्स, कामशेत ता. मावळ जि.पुणे) यास कामशेत पोलिस स्टेशनला गु.र.नं. २९/२०२५ भारतीय न्याय संहिता अधिनियम सन २०२३ वे कलम २८७ सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम सन १९७५ चे कलम ३.७ प्रमाणे गुन्हा रजि दाखल आहे.

सदर गुन्हयात घटनास्थळी मिळून आलेला ज्वलंतशील पेट्रोल सदृष्य व रॉकेल सदृष्य मालाचे वर्णना खालीलप्रमाणे…
१) २०,००० एक पिवळे रंगाचा अंदाजे २२० लिटर मापाचा प्लास्टिकचा बॅरल त्यामध्ये अंदाजे २०० लिटर
मापाचे पेट्रोल सदृष्य द्रव्य पदार्थ किंमत अंदाजे…..
२) १८०००/- एक निळे रंगाचा अंदाजे २०० लिटर मापाचा प्लास्टिकचा बॅरल त्यामध्ये अंदाजे १८० लिटर
मापाचे पेट्रोल सदृष्य द्रव्य पदार्थ किंमत अंदाजे
३) १८०००/- एक निळे रंगाचा अंदाजे २०० लिटर मापाचा प्लास्टिकचा बॅरल त्यामध्ये अंदाजे १८० लिटर
मापाचे पेट्रोल सदृष्य द्रव्य पदार्थ किंमत अंदाजे
४) १८०००/- एक लोखंडी अंदाजे २०० लिटर मापाचा सिल्वर रंगाचा बॅरल त्यामध्ये अंदाजे १८० लिटर मापाचे
पेट्रोल सदृष्य द्रव्य पदार्थ किंमत अंदाजे…..
५) २१००/- एक निळे रंगाचे ३५ लिटर मापाचे प्लास्टिकचे कॅन त्यामध्ये ३५ लिटर मापाचे रंगहीन रॉकेल सदृष्य द्रव्य पदार्थ एकुण किंमत
६) २१००/- एक निळे रंगाचे ३५ लिटर मापाचे प्लास्टिकचे कॅन त्यामध्ये ३५ लिटर मापाचे रंगहीन रॉकेल सदृष्य द्रव्य पदार्थ एकुण किंमत
७) २१००/- एक निळे रंगाचे ३५ लिटर मापाचे प्लास्टिकचे कॅन त्यामध्ये ३५ लिटर मापाचे रंगहीन रॉकेल सदृष्य द्रव्य पदार्थ एकुण किंमत
८०,३००/- येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा माल जप्त केलेला आहे.

सदरची कामगिरी पंकज देशमुख, पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण तसेच अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, सहा पोलिस अधिक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक, रविंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय शेडगे, सहा पोलिस उपनिरीक्षक नितेंद्र कदम, पोलिस अंमलदार समिर करे, पोकों/मारकड, पोकों/माळवे, पोकॉ/ गारगोटे, पोकॉ, ठाकुर, चापोकों रविद्र राउळ तसेच तहसिल कार्यालय, वडगांव मावळ येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी तुषार तुकाराम तनपुरे व पुरवठा निरीक्षक संदिप प्रकाश तनपुरे यांचे समक्ष केलेली आहे.

लोणावळा येथे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत हेल्मेट वाटप अन् बाईक रॅली…

लोणावळा परिसरात सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरूच…

लोणावळा येथे सत्यसाई कार्तीक यांनी संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत मोठी कारवाई…

Video: लोणावळा येथे अश्लिल चित्रफीत तयार करणा-या टोळीवर कारवाई; पाहा नावे…

सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!