
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दिवसांचा ब्लॉक; पाहा वाहतूकीतील बदल…
मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर असलेल्या डोंगरगाव-कुसगावनजीक पुणे वाहिनीवर पूल बांधला जात आहे. त्याचे गर्डर बसवण्यासाठी नुकताच 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर आता याच मार्गावर पुन्हा एकदा 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 27 जानेवारीपासून पुढे 3 दिवस गर्डर बसवण्याचे काम करण्यात येणार आहे.
27 जानेवारी ते 29 जानेवारी या तीन दिवशी दररोज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत 3 तासांचा ब्लॉक एमएसएरडीसीकडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक इतर मार्गाने वळवली जाणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण ते वरसोली टोलनाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोडमार्गे पुण्याकडे वळवण्यात येईल.
पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक मुंबई वाहिनीवरून सुरू राहणार आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी एमएसआरडीसीने याबाबत आवाहन केले आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांनी 27 ते 29 जानेवारी दरम्यान दुपारी 12 ते 3 या वेळेतील प्रवासाचे योग्य ते नियोजन करावे.
पुणे शहरात ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहिम अन् वाहतूकीत तात्पुरता बदल…
पुणे शहरातील कात्रज चौकातील उड्डाण पुलाचे कामामुळे वाहतूकीत बदल…
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी अवजड वाहनांवर बंदी; कधीपर्यंत पाहा…
पुणे पोलिस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेणार गुगलची मदत…
वाहतूकीला शिस्त! पोलिसांनी गाडी उचलल्यास किती होणार दंड…

