घाटंजी नजीकच्या येळाबारा धबधब्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृत्यू…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी नजीकच्या येळाबारा धबधब्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या युवकाचा शोध सुरू आहे. युवकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नैसर्गिक सौंदर्याणे परिसरात प्रसिद्ध असलेल्या येळाबारा येथील धबधब्यावर तरुण युवक, युवतींची मोठ्या प्रमाणात दररोज गर्दी राहते. घाटंजी तालुक्यातील दोन युवक धबधबा पाहण्याचा आनंद घेत असताना, क्षणात एकाचा […]
अधिक वाचा...न्यायालयात थुंकताना न्यायाधीशांनी पाहिले अन् तात्काळ…
यवतमाळ : चोरीच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला जामीन मिळालाच होता. पण, थुंकण्याची सवय चांगलीच महागात पडली आहे. न्यायालयाच्या परिसरात थुंकल्याने न्यायाधीशानी तात्काळ जामीन रद्द केला आणि तुरुंगात रवानगी केली. यवतमाळ जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या परिसरात ही घटना घडली. चोरीच्या प्रकरणात एक वर्षाची शिक्षा आणि हजार रुपये दंड वणीच्या न्यायालयाने गोविंद जाधव या आरोपीला सुनावली […]
अधिक वाचा...पार्डी (नस्करी) येथील दावा घाटंजी न्यायालयात खारीज…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पार्डी (नस्करी) येथील वादी शंकर भिमा मरापे (वय ५८) यांनी घाटंजी येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केलेला दावा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांनी खारीज केला. प्रतिवादी गुलाब मोतीराम सिडाम यांचेतर्फे ॲड. विजय भुरे, ॲड. […]
अधिक वाचा...मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात चौघांना वरिष्ठ वकीलाचा दर्जा…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मुंबई उच्च न्यायालयाने कायद्याचे विशेष ज्ञान व दिर्घ अनुभव लक्षात घेता नागपूर येथील प्रसिद्ध वकील ॲड. अक्षय नाईक, ॲड. देवेंद्र चव्हाण, ॲड. मोहन सुदामे व ॲड. फिरदौस मिर्झा आदींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वरिष्ठ वकीलाचा दर्जा दिला आहे. वरिष्ठ वकीलाचा दर्जा १८ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आला आहे. […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरणात पतीचा अथडळा म्हणून खून; आरोपींना घाटंजी पोलिसांनी केली अटक…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी पोलिस स्टेशन अंतर्गत राजुरवाडी येथे प्रेम प्रकरणात पती प्रभाकर मारवाडी याचा अडथळा निर्माण होत असल्याने त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. या प्रकरणी फिर्यादी सुधाकर कवडूजी मारवाडी (वय 46, रा. राजूरवाडी ता. घाटंजी) यांच्या जबानी रिपोर्ट वरुन आरोपी प्रियकर सुरज रोहणकर (वय 28) व जयश्री प्रभाकर मारवाडी (वय 28) […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सश्रम कारावास…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : नायगांव (बु.) ता. वणी येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पांढरकवडा येथील जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत पाचभाई यांनी आरोपी कवडु दौलत बोबडे (वय 39) यास 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व द्रव दंड ठोठावला आहे. सदर प्रकरणात शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. प्रशांत मानकर […]
अधिक वाचा...घाटंजी न्यायालयासह यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने यवतमाळ येथील जिल्हा न्यायालय, यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयात 27 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रीय लोक अदालत सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. घाटंजी येथील न्यायालयात सकाळी कोर्ट क्रमांक 1 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. […]
अधिक वाचा...अल्पवयीन आदिवासीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला १० वर्षांची शिक्षा…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : झरी जामणी तालुक्यातील रामपूर येथील एका अल्पवयीन आदिवासी पिडीतेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी अनिल लालू मोरे (वय 35 रा. रामपूर ता. झरी जामणी जि. यवतमाळ) यांस पांढरकवडा येथील विशेष न्यायाधीश २ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी अल्पवयीन पिडीतेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी 10 […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला ७ वर्षाची शिक्षा…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : पांढरकवडा तालुक्यातील बोथ (बहात्तर) येथील आदिवासी आश्रम शाळेतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी त्र्येंबक शामराव आत्राम (वय ६३ रा. जांब ता. घाटंजी) यांस पांढरकवडा येथील विशेष न्यायाधीश २ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी विनयभंग केल्या प्रकरणी ७ वर्षाची शिक्षा व ₹ ७००० द्रव्य दंडाची […]
अधिक वाचा...पारवा पोलिसांनी दाखल केलेला ‘ब’ समरी फायनल घाटंजी न्यायालयाने फेटाळला…
घाटंजी, यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत कुर्ली येथील माजी सरपंच अयनुद्दीन शमसुद्दीन सोलंकी यांची माजी मंत्री शिवाजीराव शिवराम मोघे, देवानंद पवार यांनी २५ लाख रुपये घेऊन संगणमत करुन फसवणूक केल्या प्रकरणी माजी मंत्री शिवाजीराव शिवराम मोघे, माजी स्वीय्य सहाय्यक देवानंद नरसिंग पवार विरुद्ध तत्कालीन ठाणेदार पंजाब वंजारी यांनी पारवा पोलिस ठाण्यात अपराध […]
अधिक वाचा...
