सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे आरोपींनी केले कबूल; हत्येचे सांगितले कारण…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुली आरोपींनी दिली आहे. हत्याप्रकरणाच्या खटल्याच्या बुधवारी पार पडलेल्या सुनावणीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड गँगच्या तीन जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. त्यामुळे बीडचा आका म्हणून कुख्यात झालेल्या वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा […]
अधिक वाचा...वाल्मिक कराड याचा आयफोन मधील डेटा रिकव्हर करताच सत्य आलं समोर…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रातून वाल्मिक कराड याच्याकडे असलेला प्रचंड पैसा आणि त्याच्या श्रीमंतीचा तपशील समोर आला आहे. आरोपपत्रातील या नव्या माहितीनुसार, पोलिसांनी वाल्मिक कराड याची सगळ्या मालमत्तेचा तपशील बाहेर काढला आहे. वाल्मिक कराड याच्याकडे तीन आयफोन होते. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वाल्मिक कराड याने या […]
अधिक वाचा...संतापाची लाट! क्रौर्याची परिसीमा गाठणारे संतोष देशमुख यांचे व्हिडिओ अन् फोटो…
मुंबई : मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रामधून संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने मारहाण करण्यात आली, या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओची माहिती समोर आली आहे. मारहाण केल्यानंतर संतोष देशमुख यांच्यासोबत आरोपीने फोटो आणि व्हिडिओ देखील काढल्याचे पाहायला मिळाले. या फोटोंमधून आरोपींनी त्यावेळी क्रौर्याची […]
अधिक वाचा...कराड-मुंडेंच्या बातम्या का बघतो? म्हणून बेदम मारहाण; आरोपी कर्नाटकमधून ताब्यात…
बीड : वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या बघतो म्हणून मारहाण करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी कर्नाटकमधून ताब्यात घेतले आहे. वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा युवकांची नावे आहेत. धारूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या मोबाईलमध्ये का पाहतो? म्हणून […]
अधिक वाचा...वाल्मिक कराड याचा PSI सोबतचा फोन व्हायरल; मी बीड जिल्ह्याचा बाप…
मुंबई : आवादा कंपनी खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड जेलमध्ये असताना त्याचे अधिकारी, गुंड, कार्यकर्ते, समर्थकांसोबतचे ऑडिओ कॉल व्हायरल होत आहेत. वाल्मिक कराड आणि पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे यांच्यादरम्यान होत असलेल्या संवादाचा काही भाग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मुलाला वाचविण्याचा आदेश वाल्मिक कराड पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा यांना देत असल्याचे […]
अधिक वाचा...तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या पोलिसांची नावं केली जाहीर! पाहा यादी…
पुणे: मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह अन्य आरोपी अटकेत आहेत. वाल्मिक कराड आणि इतरांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर वाल्मिक कराड याच्यावर सातत्याने आरोप सुरू आहेत. वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो. विरोधकांनी अनेक आरोपही […]
अधिक वाचा...वाल्मिक आणि बीड पोलिसांची Audio क्लिप व्हायरल; सनीने सगळचं सांगितले…
बीड : वाल्मिक कराड आणि बीडमधल पोलिस अधिकाऱ्यांची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप बनावट नोटा प्रकरणात आरोपी असलेल्या सनी आठवले या आरोपीने स्वतःच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या ऑडिओमुळे खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी असलेला आरोपी वाल्मिक कराड आणि बीड पोलिसांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल […]
अधिक वाचा...वाल्मीक कराड याची प्रकृती खालावली; तुरुंगातून हलवलं, ICU मध्ये उपचार सुरू…
बीड: खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती खालावल्यामुले मध्यरात्री त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यरात्री अचानक वाल्मिक कराड याला पोट दुखीचा त्रास सुरू झाला. यानंतर पोलीस बंदोबस्तात वाल्मीक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, वाल्मिक कराड याच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवून […]
अधिक वाचा...वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी…
बीड : आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आणि सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या वाल्मिक कराड याला बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने आज (बुधवार) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आमच्याकडून तपास पूर्ण झाला आहे, असे गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयाला सांगितले. वाल्मिक कराड हा याआधी जवळपास २१ दिवस पोलीस कोठडीत होता. बीडच्या […]
अधिक वाचा...वाल्मिक कराड याला 7 दिवसांची पोलिस कोठडी…
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी वाल्मिक कराड याच्या पोलिस कोठडीची मागणी एसआयटी पथकाने केली होती. त्यानुसार, बीड सत्र न्यायलायाने मकोका गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात जरी न्यायालयीन कोठडी मिळालेली असली तरी हत्येच्या कटात संशयित सहभागी असल्याचे कलम त्यावर लावण्यात आल्याने त्याला बीड […]
अधिक वाचा...
