आमदाराच्या पीएला रस्त्यावर खेचत केली बेदम मारहाण; कारण…

बीड: आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्वीय सहाय्यकाला भर चौकात अमानुष मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांना भर चौकात बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी माजलगाव शहर […]

अधिक वाचा...

फेसबुकवरील मित्राने घेतला मैत्रीचा फायदा अन् महिलेला…

बीड : फेसबुकवरील मित्राने मैत्रीचा फायदा घेऊन महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना परळीमध्ये घडली आहे. अकबर बबन शेख याच्या विरोधात संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस दल, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचय? फेसबुकवर झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन आरोपीने पीडित महिलेवर सहा […]

अधिक वाचा...

धक्कादायक! चुलत्याने केला अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, पीडितेने दिला बाळाला जन्म…

बीड : चुलत्याने अत्याचार केल्याने 14 वर्षीय अल्पवयीन पुतणी गर्भवती राहिली आणि तिने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चुलत्याविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आई-वडिलांसोबत पीडित मुलगी उसतोडणीवरून परत येत असताना तिला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर हा सर्व […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! नवरदेवासह बहीण अन् भाचीचा अपघातात जागीच मृत्यू…

बीड : लग्नाचा बस्ता खरेदी करून बहिणीसोबत परत येत असताना नवरदेवाच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात नवरदेवासह त्याची बहीण आणि चिमुकल्या भाचीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नासाठी बस्ता बांधून बहीण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या युवकाच्या दुचाकीला एसटी बसने दिली. युवकासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला. अंबाजोगाई येथे नवरदेवाच्या दुचाकीला एसटी […]

अधिक वाचा...

प्रेम! प्रेयसी असलेल्या मामाच्या मुलीला ओढ्याजवळ बोलावले अन् पुढे…

बीड : लग्नास नातेवाइकांनी विरोध केल्याने अल्पवयीन मुलीचा प्रियकर असलेल्या मामाच्या मुलाने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुन्हा केल्यानंतर मुख्य आरोपी भगवान गायकवाड याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घोसापुरी येथील अल्पवयीन मुलीचे तिच्या मामाच्या […]

अधिक वाचा...

दोन सहशिक्षकांनी मुख्यध्यापकांवर केला प्राणघातक हल्ला…

बीड : दोन सहशिक्षकांनी मुख्यध्यापकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी गावात घडली आहे. या घटनेत मुख्यध्यापक गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात संबंधित दोन्ही शिक्षकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. शाळेतील किरकोळ वादातून दोन सहशिक्षकांनी मुख्याध्यापकावर प्राणघातक हल्ला केल्याची […]

अधिक वाचा...

मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल…

बीडः मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना परवाना रॅली काढून जेसीबीने फुल उधळल्या प्रकरणी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील आणि इतर 12 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दहा दिवसांत जरांगे यांच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर आतापर्यंत […]

अधिक वाचा...

संतापजनक! भावकीतील महिलेने सूडाच्या भावनेतून घेतला चिमुकल्यांचा जीव…

बीड: भावकीतील महिलेने सूडाच्या भावनेतून चिमुकल्या बहीण व भावास उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजून मारल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 29 डिसेंबर 2023 रोजी घडलेल्या या घटनेचा तब्बल 20 दिवसानंतर खुलासा झाला आहे. तनुजा (वय 2) व किशोर अमोल भावले (वय 13, दोघे रा. पांढरवाडी, […]

अधिक वाचा...

बीडमध्ये भीषण अपघातात पाच जागीच ठार; गावावर शोककळा…

बीड : अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुंब्या ससेवडी गावाजवळ कंटेनर व पिकपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नेकनूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. ससेवाडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. पाच जणांचा जागीच […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! घराला लागलेल्या आगीत अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू…

बीड : आलापूर (ता. माजलगाव) येथे पत्र्याच्या शेडला अचानक आग लागली आणि घरामध्ये असलेल्या एका अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रामभाऊ शहाणे असे मृत्युमुखी पडलेल्या अंध वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिस आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी घटनास्थळावर दाखल […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!