
नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…
नाशिक: अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा विकृत भोंदूबाबा अशोक खरात हा अटकेत असून, त्याची पोलिस कोठडीची मुदत आज संपत आहे. अशोक खरातला आज (मंगळवार) दुपारी 2 वाजता नाशिक सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस तपासादरम्यान अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? याची माहिती समोर आली आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याला अटक होण्याआधीच त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची कुणकूण लागली होती. या प्रकरणातील पीडितांनी खरातवर कारवाई करण्यासाठी एका आमदाराची भेट घेतली होती. मात्र, पीडितांच्या हाती निराशा पडली. मात्र संबंधित आमदारानं या प्रकराला वाचा फोडण्याऐवजी उलट खरातलाच तक्रारीविषयी माहिती दिली. त्यामुळे प्रकरण दडपण्याच्या उद्देशाने खरातने पीडितेच्या पतीवर गुन्हा दाखल केला. यानंतर पीडितांनी दुसऱ्या आमदाराची भेट घेतली आणि संबंधित आमदारानं मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे प्रकरण घातले. शिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हे प्रकरण गेल्यानंतर त्याला वाचा फुटली.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
अशोक खरात याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो.
अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…
नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…
फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

