अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)

अभिजीत डेरे हे गेल्या नऊ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील कवठे गाव. कुटुंबातील आजोबा आणि भावाने लष्करात जाऊन देशसेवा केली तर अभिजीत डेरे आणि त्यांची पत्नी निताराणी डेरे या पोलिस दलात राहून देश सेवा करत आहेत. एक प्रकारे डेरे कुटुंबाने देश सेवेचे व्रत घेतले आहे. अभिजीत डेरे यांनी क्रीडा क्षेत्रातही विशेष प्राविण्य मिळवले आहे. श्री. डेरे यांच्याविषयी थोडक्यात…

बालपण…
अभिजीत डेरे यांचे मुळगाव सातारा जिल्ह्यातील कवठे (ता. वाई). सातारा जिल्हा हा शुरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सातारा जिल्ह्यातील कवठे या पुणे- बंगळूर महामार्गालगत असलेल्या कवठे या गावी त्यांचे बालपण गेले. कवठे गावाची ख्याती म्हणजे हे गाव स्वांतत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. भारतीय स्वांतत्र्य संग्राम चळवळ तसेच गोवा मुक्ती संग्रांमासाठी या गावातील एकुण ५२ स्वांतत्र्य सैनिकांनी इंग्रज राजवटी विरोधात लढा दिला होता. त्यापैकीच एक स्वांतत्र्यसैनिक म्हणजे कै. देशभक्त किसन महादेव वीर उर्फ आबासाहेब वीर. सातारा जिल्ह्याचे ते पहिले खासदार होते. पोलिस उपनिरीक्षक अभिजीत डेरे यांचे आजोबा कै. देशभक्त खंडेराव कृष्णा डेरे हे सुद्धा स्वांतत्र सैनानी होते. तसेच एक जातीवंत ख्यातनाम मल्ल म्हणून त्यांची ख्याती होती. अभिजीत डेरे यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. वडील शेतकरी असून सुध्दा त्यांनी आपल्या मुलांचे भवितव्य उज्वल करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले.

शिक्षण…
अभिजीत डेरे यांचे प्राथमिक शिक्षण कवठे (ता. वाई) या त्यांच्या गावीच झाले. माध्यमिक शिक्षण खंडाळा येथे पुर्ण केले. पदवी शिक्षणाकरीता स्वर्गीय बाबा आमटे यांच्या पदपर्शाने पावन झालेले आंनद निकेतन संस्थेच्या आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा, चंद्रपुर येथे त्यांनी प्रवेश घेतला आणि पूर्ण केले.

क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य…
सातारा जिल्ह्यातील विविध गावांमधील युवक लष्कर अथवा पोलिस दलात राहून देशसेवा करत आहेत. लष्करात अथवा पोलिस दलात भरती होण्यासाठी अनेकजण लहानपणापासून मैदानी खेळांवर भर देतात. शाळेत असल्यापासूनच मैदानी खेळाची आवड निर्माण होत असल्यामुळे पुढे भरती होताना फारसी अडचण येत नाही. अभिजीत डेरे यांनाही शालेय जिवनापासून क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण झाली होती. शालेय शिक्षणापासूनच त्यांनी क्रीडा क्षेत्रात त्यांनी आपले नाव कमविले होते. फुटबॉल, क्रिकेट हे त्यांचे आवडते खेळ. शालेय क्रीडा स्पर्धा, विद्यापीठ क्रीडा स्पर्धा तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. क्रीडा क्षेत्राच्या आवडीमुळे पोलिस दलात भरती होण्यास त्यांना मोठा फायदा झाला आहे.

देशसेवा करण्याची इच्छा…
अभिजीत डेरे हे लहानपणापासून लष्करातील जवानांना पाहात आले होते. शिवाय, आजोबा, भाऊ लष्करात असल्यामुळे मोठा अभिमान वाटत होता. अभिजीत डेरे यांना आपले आजोबा, भावासारखी लष्करात जाऊन देशाची सेवा करण्याची खुप इच्छा होती. प्रथम आर्मी भरतीची तयारी करुन भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले होते. लष्करात दाखल होण्याच्या दिशेने वाटचालही सुरू होती. परंतु, नियतीच्या खेळापुढे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले.

देशसेवा करत असताना भाऊ हुतात्मा…
अभिजीत रविंद्र डेरे यांचे मोठे बंधु प्रविण डेरे हे लष्कराच्या माध्यमातून देशसेवा करत होते. आसाम येथे कार्यरत असताना ते २००६ साली हुतात्मा झाले. कुंटुबासोबतच त्यांच्याही मनावर फार मोठा आघात झाला होता. कुटुंबातील एक मुलगा हुतात्मा झाल्यामुळे घरच्यांनी अभिजीत यांना लष्करात जाण्यास नकार दिला. परंतु, कोणत्या ना कोणत्या मार्गाने देशसेवा करायचे हे निश्चित केले होते. त्या दिशेने वाटचालही सुरू होती.

खाजगी कंपनीत नोकरी…
अभिजीत डेरे यांचे उच्च शिक्षण पूर्ण झाले होते. दुसऱ्या बाजूला भाऊ हुतात्मा झाल्यामुळे कुटुंबियांवर मोठा आघात झाला होता. आपल्या दुसऱ्या मुलाने उच्च शिक्षण घेतल्यामुळे चांगली नोकरी मिळणार हे कुटुंबियाना माहिती होते. अभिजीत यांनी लष्करात न जाता नोकरी करावी, असेच आई-वडिलांना वाटत होते. अभिजीत यांनी भाऊ गेल्यामुळे कुटुंबियांवर झालेला आघात जवळून पाहिला होता, अनुभवला होता. अखेर त्यांनी लष्करात न जाता नोकरी करण्याचे ठरविले. नाशिक येथे २०१० साली एका खाजगी कंपनीत रुजू झाले आणि नोकरी करू लागले.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’


पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!