
बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
बाळकृष्ण कदम हे गेल्या ३२ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलातील दीर्घ असा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शेतकरी कुटुंबातील जन्म. शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे ओळखून कोणताही क्लास न लावता यशाला गवसणी घातली. पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. पोलिस स्टेशनमध्ये काम करत असताना सर्वस्व वाहून देत सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांच्याकडे एक कला आहे. पोलिस अधिकारी म्हणून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देत असतानाच अनेक गुन्हे उघड केले आहेत. त्यांच्याविषयी थोडक्यात…
बाळकृष्ण कदम यांचे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक हे गाव. माण तालुका हा पहिल्यापासून दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. बाळकृष्ण कदम यांचा शेतकरी कुटुंबातील जन्म. चार भाऊ. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची. जिरायती शेती. शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे ओळखून वडिलांनी चारही मुलांना उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. कारण, शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. चारही भाऊ अभ्यासात लहानपणापासून हुशार. चौघांनी उच्च शिक्षण घेत विविध क्षेत्रांत भरारी घेतली. बाळकृष्ण कदम यांनी कोणताही क्लास न लावता पहिल्या प्रयत्नातच एमपीएससी परीक्षेत यश मिळविले आणि वयाच्या २४व्या वर्षी पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.
बालपण…
बाळकृष्ण कदम यांचे बालपण गोंदवले बुद्रुक गावात गेले. शेतकरी कुटुंबातील जन्म असल्यामुळे पहिल्यापासून शेतीची आवड. शेतीमध्ये काम करत कुटुंबाला हातभार लावत. निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेली शेती. शेतीवर कुटुंबाची गुजराण करणे अवघड होते. परिसरातील अनेक मुले शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर स्पर्धा परीक्षेमधून यश मिळवत. सातारा जिल्ह्यातील अनेक जण लष्कर, पोलिस खाते अथवा सरकारी नोकरीमध्ये कार्यरत आहेत. कारण, दु्ष्काळी परिस्थितीमुळे गावातून बाहेर पडण्याशिवाय अनेकांपुढे पर्याय नव्हता. बाळकृष्ण कदम यांनी हे लहानपणापासूनच हे सर्व पाहिले होते. गावामध्ये चौथीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर ते बाहेर पडले आणि थेट पोलिस अधिकारीच झाले.
शिक्षण…
१ली ते ४थी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोंदवले बुद्रुक.
५वी ते १०वी – नवचैतन्य हायस्कूल फलटण,
११वी ते १२वी – सायन्स कॉलेज कराड, सातारा.
बीएसस्सी अग्री – कोल्हापूर
एमएसस्सी अग्री – राहुरी, अहमदनगर.
शिक्षणाशिवाय पर्याय नाही…
सातारा जिल्ह्यातील माण तालुका हा दुष्काळी तालुका असल्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. बाळकृष्ण कदम हे पहिल्यापासून शाळेमध्ये हुशार. दहावीला ६० तर बारावीला ७० टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले होते. अभ्यास आणि चांगल्या गुणांच्या जोरावर त्यांचा पुढचा मार्ग सुकर होत गेला. कोणताही क्लास न लावता स्वतः अभ्यास करून चांगले गुण मिळत गेले. यामुळे बीएसस्सी अॅग्री आणि एमएसस्सी अॅग्रीला प्रवेश मिळाला. राहुरी येथे शिक्षण घेत असताना चांगले मार्गदर्शन मिळाल्यामुळे पोलिस अधिकारी होता आले, असे बाळकृष्ण कदम सांगतात.
अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन गावाबाहेर पडलो…
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक. शेतीवर गुजराण करणे अवघड असल्याचे लहानपणीच ओळखले होते. शाळेत असताना तर चांगले गुण मिळत होते. उच्चशिक्षण घेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन गावाबाहेर पडले होते. परिस्थितीची जाणीव, जिद्द आणि शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे स्पर्धा परीक्षेकडे वळाले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना कोणताही क्लास लावला नाही. स्वतःच्या हिमतीवर १५-१६ तास अभ्यास करून पहिल्या प्रयत्नातच यश मिळविले. स्वप्न साकार झाल्याचा मोठा आनंद झाला. अधिकारी झाल्यानंतर गावाने केलेला सत्कार मान उचंवणारा होता. एक जिद्द आणि ध्येय समोर असेल तर आवघड असे काहीच नाही. अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन बाहेर पडलो आणि अधिकारी झाल्यानंतर अभिमानाने गावात गेल्याचा एक वेगळाच आनंद होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकाने स्वप्न उराशी बाळगून ध्येयाच्या दिशेने वाटचाल ठेवली तर नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे बाळकृष्ण कदम सांगतात.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…