
संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
पुणे शहर पोलिस दलात पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले संदीप सिंग गिल यांनी खडतर प्रवासातून यशाचे शिखर गाठले आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी असा त्यांचा प्रवास राहिला आहे. यशाचा प्रवास करत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पण, जिद्दीच्या जोरावर त्यांनी यशाला गवासणी घातली. संदीप सिंग गिल यांची प्रेरणादायी वाटचालीविषयी थोडक्यात…
संदीप सिंग गिल यांची मातृभूमी पंजाब. एका खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील जन्म. कुटुंबाची परिस्थिती जेमतेम. वडिलांचे लहानपणीच छत्र हरपलेले असल्यामुळे परिस्थितीची जाणीव लहानपणीच झाली होती. शाळेत पहिल्यापासूनच हुशार. पण, दहावी झाल्यानंतर पुढे काय? काहीच माहीत नव्हते. स्थानिक भाषेतील शिक्षणामुळे इंग्रजीचा फारसा गंध नव्हता. महाविद्यालयीन शिक्षण सुरू केल्यानंतर इंग्रजी भाषा येत नसल्यामुळे कमीपणा वाटू लागला, शिक्षकाचा शब्द मनाला लागला आणि काही करून इंग्रजी भाषा शिकायचीच, असा मनाशी चंग बांधला. पुढे अभ्यास करून जिद्दीच्या जोरावर इंग्रजी विषयाचे ते प्राध्यापक झाले.
शेतकरी कुटुंब…
संदीप सिंग गिल यांचे बालपण एकत्र कुटुंबात गेले. लहानपणापासून शेतीमध्ये विविध कामे करावी लागत असत. वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आईच्या मार्गदर्शनाखाली लहानाचे मोठे होत होते. काहीतरी करून दाखवायची पहिल्यापासून जिद्द होती. खेडेगाव असल्यामुळे अनेक मर्यादा येत असत. पण, मर्यादांना ओलांडून यश खेचून आणण्याचे मनी स्वप्न होते. शाळेतील शिक्षण घेत असताना सुट्टीच्या दिवशी शेतामधील कामे करण्यात वेळ जात असे. लहानपणापासूनच मोठमोठी कामे करायची सवय लागली होती. या कामांमुळेच हळूहळू घडत गेल्याचे संदीप सिंग गिल सांगतात.
शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जावे लागायचे. गावापासून शाळा सहा कि.मी. अंतरावर होती. त्यामुळे दिवसभरात बारा-पंधरा कि.मी.चा सायकलवरून प्रवास होत असे. सायकल प्रवासामुळे छान असा व्यायामही होत असे. शाळेत पहिल्यापासून हुशार म्हणून गणना होत होती. पण, ते स्वतःला हुशार समजत नव्हते. कारण, खेडेगावातील इतर मुलांमधून हुशार म्हणजे सर्वसामान्य असेच स्वतःला समजत. शाळेमध्ये असताना नेहमीच पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावर असत. दहावीमध्ये ८० टक्के गुण मिळाले आणि यशाची पहिली पायरी यशस्वीरीत्या पार केली.
दहावी नंतर पुढे काय?
दहावीमध्ये तर चांगले गुण मिळाले होते. पण, पुढे काय? हा प्रश्न समोर होताच. शेतकरी कुटुंब आणि गावामध्ये पण फारसे कोणी शिकून मोठे झालेले नव्हते. यामुळे मार्गदर्शन नव्हते. समोर अंधार होता. पुढे काय करायचे, याबद्दल काहीच माहीत नव्हते. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अकरावीला प्रवेश घेतला. कॉलेज सुरू झाले होते. इंग्रजीचा काहीच संबंध येत नव्हता. इंग्रजीचे शिक्षक इंग्रजीवरून बोलल्यामुळे अपमानास्पद वाटले. त्याक्षणीच इंग्रजी शिकण्याचे मनोमन ठरवले. पण, चॅलेंज स्वीकारले असले तरी पुढे अडचणी आ वासून उभ्या होत्याच. खेडेगाव असल्यामुळे गावात इंग्रजी येणारे अथवा बोलणारे कोणीच नव्हते. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायचे तर बोलायचे कोणासोबत? हा प्रश्न समोर होताच. पण, कितीही प्रश्न असले तरी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवायचेच, ही मनाशी जिद्द बांधली.
इंग्रजी शिकण्यासाठी घरात स्वतंत्र टीव्ही घेतला. टीव्हीवर फक्त इंग्रजी न्यूज चॅनेलच सुरू असायचा. टीव्हीवरील बातम्या, चित्रपट पाहून शिक्षणात प्रगती होत असतानाच इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले होते. बीएला ७० टक्के गुण मिळाले होते. पदवी हातात आली होती.
विद्यार्थ्यांसाठी सुरू केले इंग्रजीचे क्लास…
पदवी तर मिळवली होती. पण, पुढे काय करायचे हा प्रश्न होताच. बीएची पदवी घेतल्यानंतर अनेक पुस्तके वाचून काढली. छोटी-मोठी कामे सुरू होती. व्यवसायसुद्धा करून पाहिला. पण, त्यामध्ये मन रमत नव्हते. ज्ञान प्राप्त केले असले तर पोटाचा प्रश्न होताच. गाव आणि गावाशेजारील विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे क्लास घेतले. क्लासमधून पैसे मिळत होते. शिवाय, एमए (इंग्रजी) साठी चंदीगड येथे शिक्षण सुरू होते. कॉलेज करत असतानाच UGC परीक्षा उत्तीर्ण झाले आणि एक सुकर मार्ग सापडला.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…